V Shape Ring: तरुणींमध्ये वाढतंय ‘व्ही’ रिंगचं आकर्षण!
आजच्या काळात तरुणींमध्ये अंगठी घालण्याचं आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पूर्वी अंगठी ही फक्त साखरपुडा किंवा लग्नाशी संबंधित दागिना मानली जायची, मात्र आता ती दैनंदिन फॅशनचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि फॅशन इन्फ्लुएन्सर्सकडून दिसणारे विविध ट्रेंडी डिझाइन्स, मिनिमल आणि स्टॅकेबल रिंग्स यामुळे तरुणी या ट्रेंडकडे अधिक आकर्षित होत आहेत. सध्या V’ शेपमध्ये तयार केलेली गोल्ड रिंग फार ट्रेंडमध्ये आहे. ही अंगठी अत्यंत स्टायलिश आणि मॉडर्न डिझाइनची आहे.(the appeal of the vanki ring is growing among young womens)
‘व्ही’ शेपमध्ये तयार केलेली ही गोल्ड रिंग साधी असली तरी तिच्यातील नाजूक स्टोन्समुळे ती खूपच आकर्षक दिसते. अशा प्रकारच्या अंगठ्या सध्या तरुणींमध्ये ट्रेंडमध्ये आहेत, कारण त्या मिनिमल लुक देतानाच हातांना एक एलिगंट टच देतात. ही अंगठी कोणत्याही आउटफिटसोबत सहज जुळते मग ते पारंपरिक असो किंवा वेस्टर्न आणि ऑफिससाठी तर ती उत्तम पर्याय ठरते.
या अंगठीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिचं युनिक डिझाइन. ‘व्ही’ शेपमुळे बोटं अधिक स्लिम आणि लांब दिसतात, ज्यामुळे हातांची सुंदरता अधिक खुलते. ही अंगठी प्लेन गोल्डमध्येही उपलब्ध आहे, तसेच त्यात छोटे चमकदार स्टोन्स लावले की ते पण सुंदर झळाळी देतात. हही अंगठी रोजच्या वापरासाठीही योग्य आहे, कारण ती जास्त जड नाही आणि हातात घातल्यावर खूप कम्फर्टेबल वाटते. ऑफिस, कॉलेज किंवा एखाद्या छोट्या कार्यक्रमासाठीही ही अंगठी सहजपणे कॅरी करता येते.
आजच्या फॅशन ट्रेंडमध्ये अशा मिनिमल आणि क्लासी अॅक्सेसरीजला विशेष महत्त्व आहे. मोठ्या आणि जड दागिन्यांपेक्षा अशा हलक्या, स्टायलिश अंगठ्या तरुणींना अधिक आवडत आहेत. ही अंगठी केवळ एक दागिना नसून, स्वतःची स्टाइल आणि व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. त्यामुळे अशा डिझाइनच्या अंगठ्या येत्या काळात आणखी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.