Mumbai-Pune Expressway : खंडाळाच्या ट्रॅफिकपासून सुटका होणार, मिसिंग लिंकची ही आहेत खास वैशिष्ट्ये
मुंबई : मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई असा प्रवास करताना अनेकदा खंडाळा घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकची योजना आणली. शुक्रवारी (1 मे) या मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. महाराष्ट्रातील रस्ते प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून याची काही खास वैशिष्टे आहेत, ज्यामुळे मुंबईकरांना आणि पुणेकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. यावेळी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अनेक महायुतीतील नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
Comments are closed.