Health Care: वजन कमी करायचंय? मग पोटभर हसा
जर वाढत्या वजनाने तुम्ही त्रस्त आहात आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर ही माहीती तुमच्याचसाठी आहे. कारण वजन कमी करण्यासाठी डाएट आणि जिम करण्याचा सल्ला तज्त्रमंडळी देतात. पण फक्त हसण्याने देखील वजन कमी होतं हे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे हसल्याने वजन कसं कमी होतं हे आधी समजून घेऊया.
२००५ साली वेंडरबिल्ड यूनिवर्सिटीमध्ये संशोधक मैकिएज बुकोवस्कीएका यांच्या मार्गदशर्नाखाली एक संशोधन करण्यात आले. ज्यात हसण्याचा आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी ज्यावेळी आपण मनापासून हसतो त्यावेळी आपल्या हृदयाचा वेग आणि उर्जा १० ते २० टकक्ायंनी वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दररोज जर एखादी व्यकती १०-१५ मिनिट हसत असेल तर त्याच्या जवळजवळ ४० ते ५० कॅलरीज बर्न होऊ शकतात हे समोर आले. म्हणजेच दिवसात फक्त १० मिनिट हसल्याने वर्षाला २ किलो वजन कमी केलं जाऊ शकतं.
संशोधनानुसार ज्यावेळी आपण हसतो त्यावेळी आपले स्नायूही सक्रिय होतात. विशेष करुन हसताना पोट, डायफ्राम, आणि खांद्याच्या १० ते १२ मांसपेशी आकुंचन आणि प्रसरण पावतात. हा देखील व्यायामाचा प्रकार आहे. याशिवाय हसल्याने पचनशक्ती वाढते. त्यामुळे कॅलरीज सहज बर्न होतात.तसेच स्ट्रेस हार्मोन( कोर्टीसोल)ही कमी होतो. स्ट्रेस कमी झाल्याने वजनही कमी होते.
Comments are closed.