औषधी अर्जुना साल
अर्जुनाच्या झाडाची साल ही आयुर्वेदात खूप महत्त्वाची औषधी मानली जाते. या सालीचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित तक्रारी दूर होतात. तसेच त्वचाविकारावरही
अर्जुन साल फायदेशीर आहे.
1. हृदयासाठी खूप उपयुक्त-अर्जुनाची साल हृदय मजबूत करण्यास मदत करते. या सालीची पावडर सेवन केल्याने हृदयाचे स्नायू बळकट होतात.
त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
2. रक्तदाब –ही साल नैसर्गिकरीत्या रक्तदाब कमी करण्यास मदत करते त्यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते.
3. कोलेस्टेरॉल –अर्जुन साल खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.
4. रक्ताभिसरण -अर्जुन साल खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारते, त्यामुळे शरीराला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळतो.
5. अँटिऑक्सिडंट-अर्जुन सालीत अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील सूज कमी करतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
6. पचन सुधारते- अर्जुन सालीमुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोटाशी संबंधित त्रास कमी होतो.
7. त्वचेसाठी फायदेशीर-अर्जुन साल त्वचेच्या काही समस्या जसे खाज, पुरळ यांवरही काम करते.
डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अर्जुन सालीचे सेवन करावे.
Comments are closed.