लहान मुलांनी झोपेत दात खाणे सवय की आजार?
अनेकदा आपण पाहतो की, लहान मुलं झोपेत किंवा जागेपणीदेखील दात खातात. साधारणपणे 30 टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येते. दात येण्याची प्रक्रिया असो किंवा बदलती लाईफस्टाईल मुलांच्या या सवयीचा त्यांच्या दातांच्या आरोग्यावर आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असतो. ही केवळ एक सवय आहे की एखाद्या आजाराचे लक्षण? जाणून घेऊया यामागची नेमकी कारणे.
बालरोगतज्ज्ञांच्या मते, रात्री झोपेत लहान मुलं दात खात असतील तर त्या स्थितीत ‘ब्रुक्सिझम' असं म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मुलं झोपेत नकळत दात खातात. प्रामुख्याने 3 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये दिसून येते. परंतू काही किशोरवयीन मुलांमध्ये देखील ही समस्या आढळू शकते.
यामागील कारणे –
लहान मुलांमध्ये झोपेत मेंदू आणि स्नायूंमधील समन्वय पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे झोपेत जबडा घट्ट आवळला जातो आणि मुलं दात खाऊ लागतात.
पोटात जंत झाल्यामुळे होणारा त्रास किंवा गुद्दद्वारी खाज यामुळे मुले झोपेत दात खातात.
दुधाचे दात येत असताना किंवा दुधाचे दात पडून कायमचे दात येत असताना मुलांना अस्वस्थता जाणवते. यामुळे मूल झोपेत दात खातात.
हेही वाचा – मुलांना कोणत्या गोष्टी सांगाव्यात ?
वरचे आणि खालचे दात एकमेकांवर नीट बसत नसतील, तरीही मुले झोपेत दात करकरतात.
पोटात गॅस किंवा अपचन झाल्यासही दात खाण्याची समस्या उद्भवू शकते
मुलांनी दात खाणे नॉर्मल?
बालरोगतज्ज्ञांच्या मते, मूलांची रात्री झोपेत दात खाण्याची सवय नॉर्मल आहे. पालकांनी घाबरण्याची गरज नाही. मूल जसंजसं मोठं होतं, तसतशी झोप अधिक शांत आणि खोल होते आणि दात खाण्याची समस्या आपोआप दूर होते.
पालकांसाठी उपाय
मुलांच्या पोटात जंत आहेत का तपासा. यासाठी डॉक्टरांची मदत घ्या.
झोपण्यापूर्वी मुलांचा स्ट्रेस कमी करा. त्यांना गोष्टी सांगू शकता.
जर झोपेत मुलांच्या दातांचा खूप जास्त आवाज येत असल्यास बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा – New Born: बाळाच्या रुमचं इंटिरियर कसं असावं?
Comments are closed.