सुंदर दिसण्यासाठी मेकअप नाही तर या सवयी गरजेच्या
सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी मेकअप करणं गरजेचे आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. कारण मनोविज्ञानात याच कारण वेगळंच सांगण्यात आलं आहे. तर मनोविज्ञानानुसार तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगत आहात यावर तुमचं सौंदर्य अवलंबून आहे. तसेच तुमच्या चांगल्या सवयींचा देखील यात समावेश असल्याचं मनोविज्ञानात म्हटलं आहे.
यात सगळ्यात आधी तुम्ही किती हसमुख आहात किती नैसर्गिक तुम्ही हसता आणि देखाव्यासाठी किती हसता यावर देखील काही गोष्टी अवलंबून आहेत. जसे की हसमुख व्यक्ती मनानेही तेवढ्याच निर्मळ असतात त्यामुळे त्या कायम सुंदर दिसतात.
तसेच स्वीडीश संशोधनकरत्यानुसार जर तुमची झोप व्यवस्थित होत असेल तरीही तुम्ही आकर्षक दिसता. कारण कमी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत तुमची त्वचा अधिक उजळ दिसते. तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल येत नाहीत. तुम्ही फ्रेश व आनंदी दिसता.
तसेच जर तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वत:च्या कामावर ध्येयावर फोकस करत असाल तर ही गोष्ट देखील तुम्हाला सुंदर व आकर्षक बनवते.
तुम्ही कसे बोलता, कसे चालता, कसे उठता -बसता याबरोबरच कोणत्यावेळी तुम्ही कसे हातवारे करता यावरूनही तुम्ही किती घाबरट, भेदरट किंवा आत्नविश्वासू आहात हे समजत. तुमची कॉन्फिडन्ट बॉडी लॅक्वेज तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी व सुंदर बनवते.
Comments are closed.