Mother’s Day Wishes : मातृदिनानिमित्त या हटके शुभेच्छा देऊन आईच्या चेहऱ्यावर आणा हसू
आईसाठी प्रत्येक दिवस खास असला, तरी तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात एक विशेष दिवस साजरा केला जातो आणि तो म्हणजे ‘मदर्स डे’. दरवर्षी मे महिन्यात साजरा होणाऱ्या या दिवसाला भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. आजच्या या विशेषदिनी तुम्ही तिला मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. चला जाणून घेऊयात Mothers Day च्या प्रेमळ शुभेच्छा,
आईच्या चरणी वसते चारधाम,
तिच्या मायेत आहे ईश्वर !
मातृदिनाच्या शुभेच्छा आई..
ठेच लागता पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
सर्वश्रेष्ठ माझी आई!”
मातृदिनाच्या शुभेच्छा आई..
हेही वाचा – Mother’s Day 2026: भारतात ‘या’ दिवशी सुरू झाली मदर्स डे ची सुरुवात, महत्व
आई म्हणजे मायेचा अथांग सागर,
माझ्या प्रिय आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे माया, आई म्हणजे छाया,
तिच्या कुशीतच सापडते खरी सुखमाया
मातृदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा आई !!
आई नेहमी सुखी राहावी,
हीच माझी इच्छा,
आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईशिवाय अपूर्ण वाटतो प्रत्येक श्वास,
माझ्या जीवनातील विशेष व्यक्ती म्हणजे माझी आई
तिला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….
संस्कार, प्रेरणा, प्रेम म्हणजे आई..
आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी..
सगळंच जग पाहिल्यावर कळालं
आईपेक्षा सुंदर या जगात काहीच नाही..
आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती असते आई..
हॅपी मदर्स डे आई !
तुझ्या असण्याने माझे जगणे, माझी सार्थकता सिद्ध होते.
आई, तू आहेस म्हणूनच हे घर घरपण टिकवून आहे.
माझ्या आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
हेही वाचा – Mother’s Day 2026: यंदा ‘मदर्स डे’ कधी साजरा केला जाणार?
Comments are closed.