वर्किंग वुमनची स्वयंपाक योजना
नोकरदार महिलांसाठी ऑफिस आणि घर सांभाळण ही तारेवरची कसरतच असते. अशावेळी महिलांना मदत होते ती मोलकरीण आणि जेवण बनवणाऱ्या स्वयंपाकीची. पण वाढत्या महागाईमुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये बजेटमध्ये मोलकरीण, स्वयंपाकी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे वर्कींग वुमनला घरातली काम आटोपून कामावर जाण्याची दररोजची धावपळ करावी लागते. परिणामी रोजची धावपळ आणि ऑफिसमधल्या कामाच्या ताणामुळे महिलांच्या आरोग्याविषयक समस्याही वाढल्या आहेत. पण हा प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. त्यासाठी गरज आहे किचनमधील कामाच्या योग्य प्लानिंगची.
आठवड्याचं मेनू आधी ठरवा
रोज काय बनवायचं याचा विचार करण्यासाठी वेळ जातो. म्हणूनच रविवारला आठवड्याचा साधा मेनू तयार करा.
तयारी
भाज्या धुऊन, चिरून फ्रिजमध्ये ठेवा. कांदा-टोमॅटो पेस्ट, आले-लसूण पेस्ट आधी तयार ठेवल्यास वेळ वाचतो.
सोपे आणि पौष्टिक पदार्थ निवडा
पोहे, उपमा, खिचडी, पुलाव, थालिपीठ, डाळ-भात, भाज्यांचे सूप असे पटकन होणारे पदार्थ उपयोगी पडतात.
किचन अप्लायन्सचा वापर करा
प्रेशर कुकर, चॉपर, मिक्सर, एअर फ्रायर किंवा इंडक्शन वापरल्याने काम झटपट होतं.
साठा
एकदाच जास्त डाळ, उसळ किंवा ग्रेव्ही बनवून २ दिवस वापरा.
मदत
घरातील सदस्यांनी लहान कामं करावीत — भाजी चिरणे, टेबल लावणे, भांडी ठेवणे.
तयारी
सकाळच्या नाश्त्यासाठी पीठ भिजवणे, डबे तयार ठेवणे यामुळे सकाळचा ताण कमी होतो.
Comments are closed.