Satbara Utara: ७/१२ उताऱ्यातील ७ आणि १२ चा नेमका अर्थ काय?
जमीन म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो ‘सातबारा उतारा’ शेती असो, जमीन खरेदी-विक्री असो किंवा बँकेचं कर्ज ७/१२ उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज (document) मानला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का याला ‘सातबारा’च का म्हणतात? आणि या ७ आणि १२ आकड्यांचा नेमका अर्थ काय असतो? (7 12 utara meaning in)
‘७’ काय दर्शवतो?
महसूल विभागाच्या नियमानुसार ‘७’ म्हणजे गाव नमुना क्रमांक ७. यालाच ‘अधिकार अभिलेख पत्रक’ असंही म्हटलं जातं. हा भाग जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित असतो. यामध्ये जमिनीचा सर्व्हे नंबर, मालकाचं नाव, जमिनीचं क्षेत्रफळ आणि त्या जमिनीवर कोणतं कर्ज आहे का याची संपूर्ण माहिती नमूद केलेली असते.
‘१२’ म्हणजे काय?
‘१२’ म्हणजे गाव नमुना क्रमांक १२. याला ‘पिकांची नोंदवही’ किंवा ‘पेरे पत्रक’ असं म्हटलं जातं. जमिनीचा मालक कोण आहे हे ७ नंबरवरून समजतं… पण त्या जमिनीवर काय पिकवलं जातं, जमिनीचा वापर कसा होतो, हे १२ नंबरवरून कळतं. यामध्ये शेतात घेतलेली पिकं, सिंचनाची साधनं, किती जमीन पडीक आहे याची सविस्तर माहिती असते. ही नोंद दरवर्षी तलाठीकडून केली जाते.
data-instgrm-version=”14″>
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा
target=”_blank” rel=”noopener”>माय महानगर (@Tezzbuzznews) ने शेअर केलेली पोस्ट
Comments are closed.