Makeup In Minutes : सकाळच्या घाईत 5 मिनिटांत ऑफिससाठी कसं तयार व्हावं?
सकाळची घाई, घरातली काम, ऑफिसला निघण्याची लगबग आणि त्यात वेळेचा अभाव… अशा परिस्थितीत ऑफिस मेकअप करणं महिलांसाठी एक आव्हानचं बनतं. अनेकदा महिला वेळ नसल्याने चेहऱ्याकडे दुर्लक्ष करतो, आहेत तशाच ऑफिससाठी निघतात. अशा वेळी तासनतास मेकअप करण्यापेक्षा स्मार्ट पद्धतीने फक्त 5 मिनिटांत मेकअप करून तुम्ही तुमचं नैसर्गिक सौंदर्य खूलवू शकता. आज आपण 5 मिनिटांत कार्यालय मेकअप कसा करावा याच्या खास टिप्स खास पाहूयात.
त्वचेची स्वच्छता(1 मिनिट)
मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर हलके मॉइश्चरायझर लावावे, या ट्रिकमुळे त्वचा दिवसभर हायड्रेटेड आणि मऊ राहील. उन्हाळ्याचा विचार करता सनस्क्रीन लावणे कधीही विसरू नका.
बेस मेकअप (1.5 मिनिटे)
हेवी फाउंडेशन लावण्याऐवजी BB क्रीम किंवा CC क्रीम लावा. यामुळे त्वचेला नैसर्गिक कव्हरेज मिळते आणि चेहरा हेवी दिसत नाही. डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास थोडे कन्सीलर लावून ते नीट ब्लेंड करावे.
हेही वाचा – Skin Care: नैसर्गिक ग्लोसाठी घरीच बनवा गुलाबपाण्याचे आईस क्यूब्स
डोळ्यांचा मेकअप (1 मिनिट)
डोळे टवटवीत दिसण्यासाठी मस्करा वापरावा. यामुळे डोळे फ्रेश दिसतात. जर वेळ असेल तर हलके काजळ किंवा आयलायनर लावू शकता. यामुळे डोळे आकर्षक दिसतील.
गाल आणि ओठ (1 मिनिट)
गालांसाठी हलक्या गुलाबी किंवा पीच रंगाचा ब्लश वापरा. ओठांसाठी डार्क शेड्सऐवजी न्यूड लिपस्टिक किंवा लिप बाम वापरा, ज्यामुळे प्रोफेशनल लूक मिळेल.
लास्ट फिनिशिंग (30 सेकंद)
लॉंगलास्टींग मेकअपसाठी हलकी फेस पावडर किंवा कॉम्पॅक्ट लावून लूक पूर्ण करा.
अशाप्रकारे वरील स्टेप्स वापरून तुम्ही ऑफिससाठी 5 मिनिटांत मेकअप करू शकता.
हेही वाचा – Homemade Kajal: घरच्या घरी बनवा वॉटरप्रूफ काजळ
Comments are closed.