Health Tips : हेल्दी राहण्यासाठी काय खावेपेक्षा किती खावे महत्त्वाचे असते का?
सुदृढ आरोग्यासाठी उत्तम आहार आवश्यक आहे. आहारातून शरीराला विविध पोषकतत्वे मिळतात. त्यामुळे निरोगी आरोग्य आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आहारातील घटकांवर (पोषक) विशेष लक्ष देतो. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, सॅलड किंवा ग्रीन-टी यांसारख्या गोष्टींची निवड करताना आपण सजग असतो. परंतु, वैद्यकीय शास्त्र आणि आधुनिक जीवनशैलीनुसार, ‘काय खावे’ यापेक्षाही ‘किती खावे’हे जास्त महत्त्वाचे ठरत आहे.
तुम्ही कितीही पौष्टिक खात असलात, तरी त्याचे अतिसेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. उदाहरणार्थ, ड्रायफ्रूट्स, तूप, ऑलिव्ह ऑईल किंवा नाचणीची भाकरी आरोग्यदायी मानली जाते. परंतु, प्रमाणाबाहेर खाल्ल्यास त्यातून शरीरात अतिरिक्त कॅलरीज जातात, ज्यामुळे वजन वाढणे, अपचन आणि सुस्ती येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. याउलट, जर तुम्ही जेवणाचे प्रमाण मर्यादित ठेवले तर शरीराला आवश्यक तेवढीच ऊर्जा मिळते आणि पचन व्यवस्थित होते.
हेही वाचा – Health Tips : तुमच्या उंचीनुसार किती वजन असायला हवं?
सोपा उपाय –
लहान प्लेट – जेवताना नेहमी लहान आकाराच्या ताटाचा वापर करावा. ज्यामुळे नकळत कमी अन्न वाढले जाते.
20 मिनिटांचा नियम – मेंदूला पोट भरल्याचा संदेश मिळण्यासाठी किमान 20 मिनिटे लागतात. त्यामुळे अन्न नेहमी हळूहळू आणि चावून खावे.
स्क्रीनपासून दूर राहा – टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवल्याने आपण किती खातोय याकडे आपले लक्ष राहत नाही आणि ‘ओव्हरईटिंग’ होते.
एकदरंच निरोगी आरोग्यासाठी ताटात काय आहे यासोबतच ते किती प्रमाणात आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हेही वाचा – Paper Cup Side Effects : पेपर कपमध्ये चहा पिताय? सावधान!
Comments are closed.