Vastu Rules: रात्री झाडू मारणे किंवा नखे काढणे खरोखरच अशुभ?

आपल्या घरातील मोठी माणसं अनेकदा रात्रीच्या वेळी नखे काढायला घेतली किंवा झाडू मारायला काढला, की लगेच हटकतात. ‘रात्रीचं हे काम करू नये, अशुभ असतं!’ असं सांगतात.  बऱ्याचदा आपण या गोष्टींकडे अंधश्रद्धा किंवा जुन्या विचारांच्या गोष्टी म्हणून दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या नियमांना केवळ धार्मिकच नाही तर अत्यंत वैज्ञानिक कारण आहे.

नवीन झाडू झाडू?

हिंदू धर्मात संध्याकाळची वेळ ही घरात लक्ष्मी आगमनाची वेळ मानली जाते. झाडूला आपण लक्ष्मीचे रूप मानतो. त्यामुळे रात्री झाडू मारल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा म्हणजेच लक्ष्मी बाहेर काढतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे रात्री झाडू मारू नये असं म्हणतात.

हेही वाचा – मंदिराला प्रदक्षिणा का घालावी?

पूर्वी वीज नसायची. घरात कंदील किंवा पणत्या लावल्या जायच्या. त्यामुळे अशा अंधारात कचरा काढताना एखादी मौल्यवान वस्तू कचऱ्यात जाऊ शकते. म्हणूनच रात्री झाडू मारू नये असे सांगितलं जातं.

नखं का कापू नये?

वास्तूशास्त्रानुसार, रात्री नखे काढल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो. असे केल्याने आर्थिक चणचण भासू शकते, अशी धार्मिक मान्यता आहे.

नखे हा शरीराचा मृत भाग असला तरी त्यात घाण आणि जंतू असतात. रात्री नखे काढल्याने ती घरात कुठेही उडू शकतात. त्यामुळे रात्री कापू नये असं म्हटलं जातं.

पूर्वी नेल कटर नसायचे. लोक नखे काढण्यासाठी चाकू, विळी किंवा इतर धारदार हत्यारांचा वापर करायचे. रात्रीच्या कमी प्रकाशात नखे काढताना बोटाला दुखापत होण्याचा धोका असायचा. त्यामुळे नखं कापू नये असं सांगण्यात यायचं.

हेही वाचा – Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार कचरा कुंडी ‘या’ दिशेला असावी

Comments are closed.