Coffee :कॉफीने दूर करा डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या
चेहऱ्याची त्वचा निरोगी, चमकदार आणि तजेलदार ठेवण्यासाठी कॉफी अत्यंत फायदेशीर मानली जाते. कॉफीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि कॅफीन त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. आज आपण चेहऱ्यावर कॉफी लावण्याचे फायदे आणि तिचा कसा वापर करावा हे पाहूयात.
चेहऱ्यावर कॉफी लावण्याचे फायदे –
- कॉफीमध्ये नॅचरल एक्सपोलिएंट गुण असतात. ज्यामुळे डेड स्किन दूर होते आणि चेहऱ्यावर एक चमक येते.
- कॉफीतील ऍटी-इन्फ्लेमेटरी गुण लालसरपणा कमी करतात.
- कॉफीतील कॅफीन डोळ्यांखालील सूज कमी करते आणि डार्क सर्कलची समस्या नाहीशी करते.
- चेहऱ्यावर कॉफी लावल्याने त्वचेवरील डाग दूर होतात आणि चेहऱ्याला एक ग्लो येतो.
हेही वाचा – Makeup Remover : मेकअप काढण्यासाठी वापरू शकता हे घरगुती पदार्थ
- स्किन टाईट करायची असल्यास चेहऱ्यावर कॉफी लावावी.
- कॉफी चेहऱ्यावर लावल्याने सूर्यांच्या किरणांमुळे टॅन झालेली स्किन सुधारते.
वापर करण्याची पद्धत –
कॉफी, हळद आणि दही
चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी कॉफी, हळद आणि दह्याचा फेसपॅक लावणे फायद्याचे ठरेल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 1 ते 2 चमचे कॉफी घ्या. त्यात 2 चमचे दही आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्या. सर्व मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. या फेसपॅकमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
कॉफी आणि मध
कॉफी आणि मधाचा फेसपॅक लावल्याने त्वचा चमकदार होते आणि सैल पडत नाही. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा मध आणि 1 चमचा दही मिक्स करून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर काही वेळ लावून ठेवा.
कॉफी आणि दुध
कॉफी आणि दुधाचा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे कॉफी आणि 1 चमचा दुध मिक्स करून घ्या. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होतील.
हेही वाचा – Rice Water Ice cube : ग्लास स्किनसाठी ‘कोरियन राईस वॉटर आइस क्यूब’ बेस्ट
Comments are closed.