Interesting Facts : हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप खडीसाखर देण्यामागचं खरं कारण काय?

आपण कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो, की शेवटी बिलासोबत एका छोट्या वाटीत बडीशेप आणि खडीसाखर दिली जाते. अनेकांना वाटतं की हा फक्त हॉटेलच्या पाहुणचाराचा एक भाग आहे. पण या मोफत मिळणाऱ्या बडीशेप-खडीसाखरेमागे केवळ परंपरा नसून आरोग्यासंबंधित मोठे शास्त्र दडलंय. चला जाणून घेऊयात सविस्तरपणे,

पचनक्रिया –

हॉटेलमधील जेवण सहसा जास्त तिखट, तेलकट आणि मसालेदार असते. असे जड अन्न खाल्ल्यानंतर पोटात गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. बडीशेपमध्ये ऍनेथॉल नावाचे नैसर्गिक तेल असते, जे पोटातील पाचक रस आणि एन्जाइम्स वाढवण्यास मदत करते. यामुळे अन्न लवकर आणि सहज पचते.

हेही वाचा – Rules For Indians : ‘मोठ्याने बोलू नका!’ परदेशी हॉटेलचे भारतीयांसाठीचे नियम वाचून येईल चीड

अ‍ॅसिडिटी –

मसालेदार अन्नामुळे छातीत किंवा पोटात जड होण्याची शक्यता असते.  अशावेळी जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने पोटातील अ‍ॅसिडचा प्रभाव कमी होतो आणि जळजळ थांबते.

तोंड साफ करणे –

बडीशेपमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे तोंडातील जंतू नष्ट होतात आणि दुर्गंधी दूर होते. खडीसाखर आणि बडीशेप एकत्र मिळून मुखशुद्धीचे काम करतात.

गोड खाण्याची इच्छा –

अनेकांना जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय असते. बडीशेपसोबत खडीसाखर खाल्ल्याने ही स्वीट क्रेविंग लगेच पूर्ण होते.

थोडक्यात सांगायचे तर हॉटेल व्यावसायिक ग्राहकांचा जेवणाचा अनुभव शेवटपर्यंत आनंददायी राहावा आणि त्यांनी तृप्त होऊन घरी जावे, यासाठी ही आरोग्यदायी ‘फ्री’ सेवा देतात.

हेही वाचा – Jeans Fitting : आवडती जीन्स सैल झाली? टेलरकडे जाण्याआधी करून पाहा ‘हा’ हॅक

Comments are closed.