देशातील ऐतिहासिक सूर्य मंदिरे; वास्तुकलेचा अद्वितीय नमुना !

हिंदू धर्मात सूर्यदेवाला देवता मानले जाते. भारतामध्ये सूर्यदेवाची उपासना करण्याची परंपरा अतिशय प्राचीन असून देशात स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेली अनेक भव्य सूर्य मंदिरे आहेत. सूर्यदेवाची ही मंदिर केवळ पूजेची ठिकाणे नाहीत तर ती त्या काळातील कला, विज्ञान आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. आज आपण देशातील ऐतिहासिक सूर्य मंदिराविषयी जाणून घेऊयात.

कोणार्क सूर्य मंदिर

ओडिशातील पुरी जिल्ह्यात असणारे कोणार्क सूर्य मंदिर जगात प्रसिद्ध आहे. 13 व्या शतकात हे मंदिर राजा नरसिंह देव यांनी बांधले. हे मंदिर एका भव्य रथाच्या स्वरूपात बनवण्यात आले आहे. या रथाला 12 मोठी चाके आणि सात घोडे आहेत. या मंदिराची अशी रचना करण्यात आली आहे की सूर्याची पहिली किरणे थेट गर्भगृहावर पडतात.

मोढेरा सूर्य मंदिर

हेही वाचा – अद्भूत ! कर्नाटकातील या मंदिरांच्या खांबातून ऐकायला येतात 7 सूर

11 व्या शतकात राजा भीमदेव पहिला यांनी गुजरातच्या पाटण जिल्ह्यात हे मंदिर बांधले. वर्षातून दोन वेळा येथे सूर्याची किरणे देवतेच्या मूर्तीवर पडतात. मंदिराच्या समोर एक भव्य पायऱ्यांची विहीर आहे, ज्याला ‘सूर्यकुंड’ म्हणतात. यात लहान-मोठी एकूण 108 मंदिरे आहेत.

मार्तंड सूर्य मंदिर

काश्मीरच्या सुंदर दऱ्यांमध्ये अनंतनाग जिल्ह्यात असलेले मार्तंड सूर्य मंदिर 8 व्या शतकात राजा ललितादित्य यांनी बांधले होते. काश्मिरी स्थापत्यकलेचा हे मंदिर एक उत्तम उदाहरण आहे.

कातरमल सूर्य मंदिर

कटारमल सूर्य मंदिर हे मंदिर 9 व्या शतकात कत्युरी राजघराण्यातील राजा कटारमल यांनी बांधले. या मंदिरात सूर्याशिवाय 44 आणखी लहान मंदिरं आहेत. येथे तुम्ही सूर्योदय सूर्यास्ताचे अद्भूत दृष्य पाहू शकता.

सूर्य मंदिर

1988 साली ग्वाल्हेरचे उद्योगपती गोपाळदाम नीरज यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर पारंपरिक उत्तर भारतीय नागर शैलीत बनवण्यात आले आहे.

हेही वाचा – शिव मंदिर : भुतांनी बांधलेले शिवमंदिर

Comments are closed.