थकवा जाणवतोय? असू शकते रक्ताची कमतरता; ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश
बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सध्या अनेकांमध्ये ‘ॲनिमिया’ म्हणजेच रक्ताची कमतरता दिसून येत आहे. शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाले की थकवा येणे, चक्कर येणे, धाप लागणे आणि त्वचा निस्तेज होणे अशा समस्या उद्भवतात. विशेषतः महिला आणि मुलांमध्ये हे प्रमाण अधिक असते. यावर उपाय म्हणून महागड्या औषधांऐवजी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नैसर्गिकरीत्या हिमोग्लोबिन वाढवता येते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी कोणते पदार्थ ठरतात प्रभावी ठरतात पाहूयात.
बीट
शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बीट हा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते.
हेही वाचा – डेंग्यू, मलेरिया आणि सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी हे घरगुती काढे ठरतील वरदान
डाळिंब

लोहाची कमतरता असेल डाळिंब खाणे फायद्याचे ठरेल. तुम्ही रसाच्या स्वरूपात सुद्धा डाळिंबाचे सेवन करू शकता.
पालक

पालक रक्ताची कमतरता दूर करू शकते. याशिवाय पालकामध्ये कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस आणि प्रोटीन असतात.
अंड

अंड्यांमध्ये प्रोटिन, व्हिटामिन्स, खनिजे, लोह आणि कॅल्शियम असते. यात लोह असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी अंड्याचा आहारात समावेश करावा.
पेरू

लोह आणि व्हिटामिनने समृद्ध असलेला असा पेरू खाऊ शकता. पेरूतील घटक शरीरातील रक्ताची पातळी वाढवतात.
काजू

लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात नट्सचा समावेश करावा. तुम्ही खजूर, अक्रोड, बदाम आणि मनुका खायला हवा.
हिरव्या भाज्या

रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. यात भरपूर लोह असते.
हेही वाचा – Menopause Tips : मेनोपॉजनंतरही राहा फिट आणि आनंदी
Comments are closed.