घरच्या घरी हे पदार्थ वापरून बनवा होममेड रूम फ्रेशनर

घराला सुगंधित करण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर करण्यात येतो. रूम फ्रेशनरमुळे घर दिर्घकाळ फ्रेश राहते. बाजारात विविध फ्लेवर्समध्ये रूम फ्रेशनर मिळतात. पण, बाजारातील महागडे आणि केमिकल युक्त रुम फ्रेशनर वापरण्याऐवजी तुम्ही अगदी कमी खर्चात घरीच रूम फ्रेशनर बनवू शकता. जाणून घेऊयात, घरातील गोष्टींपासून रूम फ्रेशनर कसे तयार करायचे.

कॉफी

रूम फ्रेशनर बनवण्यासाठी कॉफी बिन्स किंवा ग्राउंड कॉफीची गरज लागेल. आता एका बाऊलमध्ये कॉफी बिन्स किंवा ग्राउंड कॉफी घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घाला. तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि हवं तेव्हा तुम्ही ते वापरू शकता.

हेही वाचा – पावसाळ्यात व्हाईट शूज मळकट होण्याची भीती? घासाघीस न करता करा झटपट स्वच्छ

संत्रा

संत्र्यापासून रूम फ्रेशनर बनवण्यासाठी संत्र्याचा रस, थोडं तेल आणि पाणी याचे मिश्रण तयार करुन घ्यावे. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा.

गुलाब

घराला सुगंधित करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळवून घ्याव्यात. तयार पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून घराच्या प्रत्येक भागात शिंपडू शकता.

कापूर

घरातल्या किचनमध्ये जास्त दुर्गंधी येते. किचनमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी कापरापासून रूम फ्रेशनर बनवू शकता. या रूम फ्रेशनरमुळे किचनमधील दुर्गंधी दूर होईल.

बेकिंग सोडा आणि दालचिनी

बेकिंग सोडा आणि दालचिनीपासून तयार केलेला रूम फ्रेशनर दिर्घकाळ घर सुगंधित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. हा रूम फ्रेशनर तयार करण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा, 1/2  चमचा दालचिनी पावडर पाण्यात मिक्स करा. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा रुम फ्रेशनर घर सुंगधित करेलच शिवाय जंतूनाशकही असेल.

हेही वाचा – तेलाच्या बाटलीवरील चिकट थर काढण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Comments are closed.