रोज चष्मा वापरून नाकावर पडलेले काळे डाग कसे दूर करावेत?
सतत चष्मा वापरल्यामुळे नाकावर काळे डाग किंवा वळ पडणे ही एक सामान्य समस्या आहे. अलिकडे तर जास्त वेळ टीव्ही, मोबाईल पाहणे यामुळे कमी वयातच चष्मा लावल्याने बहुतेकजणांना ही समस्या सतावत आहे. चष्म्यामुळे नाकावर पडलेले हे डाग चेहऱ्याचं सौंदर्य पूर्णपणे खराब करतात. यासाठी आज आपण नाकावर हे डाग कसे पडतात आणि ते कसे दूर करावे याचे काही सोपे उपाय पाहूयात.
डाग का पडतात?
चष्म्याच्या फ्रेमचा नाकावर सतत दाब पडल्यामुळे तिथले रक्तअभिसरण कमी होते आणि त्वचा काळी पडू लागते.
कोरफड (Aloevera)
कोरफडीमध्ये त्वचेला शांत करणारे आणि डाग कमी करमी गुणधर्म असतात.
वापरण्याची पद्धत – कोरफडीचा ताजा गर 10 मिनिटे डाग पडलेल्या जागी लावून हलका हाताने मसाज करावा. 10 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. नियमित हा उपाय केल्यास तुम्हाला काहीच दिवसांत फरक जाणवेल.
हेही वाचा – पावसाळ्यात व्हाईट शूज मळकट होण्याची भीती? घासाघीस न करता करा झटपट स्वच्छ
काकडी (Kukumber)
कूलिंग इफेक्ट देणारी काकडी काळे डाग कमी करण्यासाठी उपयुक्त असते.
वापरण्याची पद्धत – काकडीचे काप डाग पडलेल्या जागी ठेवा. 10 मिनिटे काप तसेच असू द्या. यामुळे डाग कमी होण्यास मदत मिळेल.
बटाट्याचा रस (Potato Juice)
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी बटाट्याचा रस उत्तम पर्याय आहे.
वापरण्याची पद्धत – बटाटे किसून त्याचा रस काढावा. तयार रस नाकांवरील डागांवर लावावा आणि वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
लिंबाचा रस (Lemon Juice)
व्हिटामिन सी ने समृद्ध असा लिंबाचा रस काळे डाग दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे.
वापरण्याची पद्धत – लिंबाच्या रसाचे काही थेंब डाग पडलेल्या जागी लावून 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
डाग पडू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
- चष्म्याचे नोज पॅड्स कडक झाले असतील तर ते बदलावेत.
- कायम मऊ नोज पॅड्स वापरावेत.
- नोज पॅड्सवर घाम आणि धूळ साचल्यानेही डाग पडतात, त्यामुळे चष्मा नियमित स्वच्छ करा.
- चष्मा लावण्यापूर्वी नाकावर थोडे मॉइश्चरायझर किंवा कोरफडीचे जेल लावा.
हेही वाचा – अपर इअर पिअर्सिंगसाठी परफेक्ट आहेत हे मिनिमल टॉप्स
Comments are closed.