युरिक ऍसिडमुळे कोणत्या आजारांचा धोका वाढतो?

सध्या अनेकांना युरिक ॲसिड (युरिक ऍसिड) वाढण्याची समस्या जाणवत आहे. शरीरात याचे प्रमाण गरजेपेक्षा वाढल्यास त्याचे लहान-लहान खडे सांध्यांमध्ये जमा होऊ लागतात. युरिक ॲसिड वाढणे हे केवळ सांधेदुखीपुरते मर्यादित नसून यामुळे किडनी फेल्युअर ते थेट हृदयविकारासारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. शरीरात युरिक ॲसिड वाढल्याने नक्की कोणत्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, जाणून घेऊया सविस्तरपणे

युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे –

  • सांध्यांमध्ये अचानक तीव्र वेदना सुरू होणे
  • उठताना-बसताना सांधे जखडल्यासारखे वाटणे.
  • हातापायांच्या बोटांना सूज येणे.
  • लघवीचा रंग बदलणे किंवा वारंवार लघवीला होणे.

पुढिल आजारांचा धोका –

  • रक्तातील अतिरिक्त युरिक ॲसिड शरीराबाहेर टाकण्याचे काम किडनी करते. पण शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाणखूप जास्त असल्यास, हे खडे किडनीमध्ये जमा होऊन किडनी स्टोन तयार होतात.

हेही वाचा – Hormonal Balance : हार्मोन्स बॅलेन्स ठेवण्यासाठी ब्रीदिंग एक्सरसाइज

  • दीर्घकाळापर्यंत युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त राहिल्याने मूत्रपिंडांना नुकसान होते आणि डायलिसिस करण्याची परिस्थिती निर्माण होते.
  • रक्तातील उच्च युरिक ॲसिडमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येतो. यामुळे रक्तदाब वाढतो आणि पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.
  • हाय युरिक ऍसिडचा थेट संबंध शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्सशी असतो. जेव्हा शरीर इन्सुलिनता योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
  • युरिक ऍसिडच्या वाढीमुळे फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवतात.

हेही वाचा – थकवा जाणवतोय? असू शकते रक्ताची कमतरता; ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

Comments are closed.