पावसात गेट आणि खिडक्यांवर गंज चढू नये म्हणून घ्या अशी काळजी
पावसाळ्याची चाहूल लागली की थंड वारे आणि हिरवागार निसर्ग मन प्रसन्न करतो. मात्र याच काळात घरातील लोखंडी गेट, खिडक्या आणि कड्या कोयंड्यांवर गंज चढण्याची समस्या सुरू होते. ओलावा, सततचा पाऊस आणि हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे लोखंडी वस्तूंचे नुकसान होऊ शकते. थोडीशी काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येते आणि गेट खिडक्या अनेक वर्षे चांगल्या स्थितीत राहू शकतात.
अँटी रस्ट कोटिंग
पावसाळा सुरू होण्यापूर्वी लोखंडी गेट आणि खिडक्यांवर अँटी रस्ट कोटिंग किंवा प्रायमर लावणे फायदेशीर ठरते. यामुळे लोखंडाचा थेट संपर्क ओलाव्याशी येत नाही आणि गंज लागण्याचा धोका कमी होतो.
व्हिनेगर
गेट किंवा खिडक्यांवर आधीच गंज दिसत असल्यास पांढरा सिरका उपयोगी ठरू शकतो. गंजलेल्या भागावर सिरका फवारून काही वेळ ठेवल्यानंतर हलके घासल्यास गंज कमी होण्यास मदत होते. त्यानंतर तो भाग कोरडा पुसणे महत्वाचे आहे.
तेल किंवा ग्रीस
पावसाळ्यात गेट आणि खिडक्यांमधून येणारा कर्कश आवाज टाळण्यासाठी कड्या आणि बिजागऱ्यांवर वेळोवेळी तेल किंवा ग्रीस लावावे. त्यामुळे हालचाल सुरळीत राहते आणि गंजही कमी प्रमाणात तयार होतो.
ओलावा साचू देऊ नका
गेट आणि खिडक्यांच्या आसपास पाणी साचत असल्यास ते त्वरित काढून टाका. सतत ओलावा राहिल्यास लोखंडी भागांचे नुकसान वेगाने होऊ शकते. नियमित स्वच्छता हा देखील एक महत्त्वाचा उपाय आहे.
वेळेवर तपासणी
पावसाळ्यापूर्वी गेट आणि खिडक्यांची तपासणी करून रंग निघालेला किंवा गंज सुरू झालेला भाग दुरुस्त करावा. वेळेवर केलेली देखभाल मोठा खर्च वाचवू शकते.
Comments are closed.