तांब्याच्या बाटलीत पाणी पिताय? मग या चुका पडतील महाग

तांब्याच्या बाटलीतलं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे हल्ली बरेचजण तांब्याच्या बाटलीत पाणी पितात. तांब्यात उपजतच अँटी बॅक्टेरियल गुण असल्याने पाणी शु्दध होते. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होते. शिवाय रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. पण तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना विशेष काळजीही घ्यावी लागती. नाहीतर फायद्यांपेक्षा नुकसानच अधिक होते. हे टाळण्यासाठी कोणत्या चुका करू नयेत ते बघूया.
गरम उकळते पाणी
बरेचजण तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात गरम उकळते पाणी भरून ठेवतात. दिवसभर तेच पितात. पण असे करणे चुकीचे आहे. कारण तांब्याच्या भांड्यात किंवा बाटलीत उकळते गरम पाणी टाकल्याने संथ गतीने तांबे वितळण्याची शक्यता असते. ज्यामुळे पाण्यासोबत शरीरात तांबे हा धातुही द्रवरुपात जातो.
इतर शारीरिक समस्या
गरम पाण्यातून शरीरात गेलेल्या तांब्यामुळे अनेक त्रास होऊ शकतात. कारण तुमच्या शरीराला तांबेही पचवावे लागते. त्याचा किडनीवरही परिणाम होऊ शकतो.
रिकाम्या पोटी पाणी पिणे
काहीजण रात्री तांब्याच्या बाटलीत , भांड्यात पाणी भरून ठेवतात. सकाळी रिकाम्या पोटी ते ापणी पितात. हे पाणी पिण्यास जड असते. त्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे असे करू नये.
यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर जरी असले तरी काळजीही घेणे गरजेचे आहे.
फायदे
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने संधीवाताचा त्रास कमी होतो.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
पोटाचा अल्सर, इन्फेक्शन आणि अपचनाच्या समस्या कमी होतात.
शरीराची सूज उतरते.
Comments are closed.