रात्री उशीरा जेवण केल्याने वाढतो या आजारांचा धोका

सध्या सुरू असलेल्या धकाधकीच्या आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना रात्री उशीरा जेवण्याची सवय जडली आहे. ऑफिसचे काम, प्रवासातील वेळ किंवा रात्री उशीरापर्यंत मोबाईल स्क्रोल करत बसण्यामुळे जेवणाची वेळ सतत पुढे ढकलली जाते. पण, तुमची हीच सवय आरोग्यासाठी ‘सायलेंट किलर’ ठरत आहे. रात्री उशीरा जेवल्याने केवळ वजनच वाढत नाही, तर शरीराचे संपूर्ण चक्र बिघडून अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. जाणून घेऊया उशीरा जेवल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात.

लठ्ठपणा

रात्री उशिरा जेवल्यास रात्री खाल्लेले अन्न ऊर्जेत रुपांतरीत न होता चरबीच्या स्वरूपात शरीरात साठते. यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते.

हेही वाचा – डिजिटल डिटॉक्ससाठी तरूणाईमध्ये वाढतोय अ‍ॅनालॉग छंदांचा ट्रेंड

मधुमेह

उशिरा जेवल्याने शरीरातील इन्सुलनची पातळी बिघडते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते आणि टाइप 2 चा डायबिटीज होऊ शकतो.

आंबटपणा

रात्री उशीरा जेवण केल्याने झोपण्यास उशीर होऊ नये यासाठी जेवल्यावर काहीजण लवकर झोपतात. परंतू जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पोटात ऍसिड तयार होते. यामुळे छातीत जळजळ, गॅस, अपचन, आंबट ढेकरसारखे त्रास सुरु होतात.

हृदयविकार

रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सचा स्तर वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

कॅन्सर

काही संशोधनानुसार रात्री उशीरा जेवल्याने स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका उद्भवतो.

झोपेचे विकार

शरीर अन्न पचवण्यात व्यस्त राहिल्यामुळे गाढ झोप लागत नाही. यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते.

जेवणाची योग्य वेळ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण करणे फायदेशीर असते.

हेही वाचा – वाईट आणि त्रासदायक आठवणी कशा हाताळाव्यात?

Comments are closed.