बदलत्या काळासोबत बदलला बाबा; यंदा ‘फादर्स डे’ला तुमच्या ‘कूल डॅड’ला द्या हे भन्नाट गिफ्ट्स

जगभरात येत्या रविवारी (21 जून) ‘फादर्स डे’ साजरा होणार आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. मुलांच्या जडणघडणीत आईसह वडिलांचाही वाटा तितकाच महत्त्वाचा असतो. परंतू तो अनेकदा दिसून येत नाही. अनेक महान संत, विचारवंत यांनी आईचे ऋण सर्वत्र मांडले आहेत पण वडिलांच्या प्रेमाविषयी किंवा मायेविषयी बोलणारे आजही फार कमीच आहेत.

पूर्वी ‘बाबा’ म्हटलं की कडक शिस्त, समोर जाण्याची भीती आणि एक आदरयुक्त अंतर असायचं. पण आजचा बाबा मुलांचा केवळ मार्गदर्शक नाही तर त्यांचा हक्काचा मित्र बनला आहे. आता वडिलांची भूमिका केवळ पैसे कमवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आजचे ‘डॅड’ मुलांच्या संगोपनात आईइतकीच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुलांचा अभ्यास घेणे असो, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणे असो वा त्यांना खेळायला घेऊन जाणे, आजचा बाबा प्रत्येक गोष्ट करत आहे.

हेही वाचा – डिजिटल डिटॉक्ससाठी तरूणाईमध्ये वाढतोय अ‍ॅनालॉग छंदांचा ट्रेंड

सर्वात मोठा बदल म्हणजे मुलांशी संवाद वाढला आहे. आजची मुलं आपल्या करिअरचे प्लॅन्स, मनातील इच्छा आणि अगदी मानसिक तणावासारख्या गोष्टीही वडिलांशी मित्रासारख्या शेअर करत आहेत. बाबा देखील जुनाट विचार बाजूला ठेवून मुलांच्या मताचा आदर करताना दिसत आहे.. रविवारी साजऱ्या होणाऱ्या फादर्स डे निमित्त तुमच्या कूल डॅड, बाबा, पॉप्सला काय गिफ्ट देता येतील याचे भन्नाट पर्याय पाहूयात.

फुटवेअर – वयानुसारऑर्थोपेडिक किंवा चांगल्या ब्रँडचे आरामदायक शूज

आऊटफिट – कॉटनचे हलके शर्टस, लिनन कुर्ता किंवा पोलो टी शर्ट

ऍक्सेसरीज – घड्याळ, सनग्लासेस, लेदर वॉलेट

ग्रूमिंग किट – ज्यामध्ये ट्रिमर, शेव्हिंग, लोशन

इअरबड्स – प्रवासात किंवा वॉकिंग करताना गाणी,बातम्या ऐकण्यासाठी इयरबड्स

जर तुम्हाला बाजारातील रेडिमेड गिफ्ट बाबांना द्यायचे नसेल तर तुमच्या हातांनी बाबांसाठी एखादा पदार्थ, ज्यूस, ग्रिटिंग कार्ड देऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा वेळ देऊ शकता. फादर्स डे ला त्यांच्यासोबत बसून मस्त गप्पा मारा, यासारखे मोठे गिफ्ट त्यांच्याकडे नसेल.

हेही वाचा – International Yoga Day : शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य निरोगी ठेवणारा योगाभ्यास

Comments are closed.