पुरुषांनी 50शीनंतर त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी फॉलो करावे हे स्किनकेअर रुटीन

तुम्ही तुमचे बाबा, दादा स्किनकेअर रुटीन फॉलो करत आहेत, त्यांच्या त्वचेची काळजी घेत आहे  असं चित्र पाहिलंय का? फार कमी घरात पुरुष त्वचेची काळजी घेतायत, विविध प्रोडक्ट वापरत आहेत असं चित्र दिसतं. आजचे कूल डॅड हमखास ही गोष्ट करत असतील पण बहुतेक घरातील पुरुष नाहीचं.. यंदाच्या फादर्स डे निमित्त तुम्ही वयाची पन्नाशी ओलाडलेल्या तुमच्या बाबांना असणाऱ्या दादाला पुढील स्किनकेअर रुटीन फॉलो करायला सांगू शकता.

साफ करणारे

साध्या साबणाऐवजी एखादे माईल्ड फेसवॉश वापरण्याचा सल्ला देऊ शकता. दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुण्याची सवय त्यांना लावा.

मॉइश्चरायझर

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर उत्तम दर्जाचे मॉइश्चचरायजर लावण्याची सवय लावा. तुम्ही त्यांना व्हिटामिन ई असलेले मॉइश्चरायजर गिफ्ट देऊ शकता.

हेही वाचा – चाळिशीतही चेहरा दिसेल विशीतला, फॉलो करा या मॅजिक टिप्स

सनस्क्रीन

उन्हामुळे त्वचेवर काळे डाग, पिग्मेंटेशन, सुरकुत्या येतात. त्यामुळे त्यांना SPF 30+सनस्क्रीन लावण्यास सांगू शकता.

शेव्हिंग

शेव्हिंग केल्यानंतर अनेक पुरुषांना अल्कोहोल असलेले आफ्टरशेव्ह लोशन लावतात, मात्र यामुळे त्वचेची जळजळ होते. अशावेळी त्यांना कोरफड जेल लावण्यास सांगू शकता.

पाणी पिणे

वाढत्या वयात त्वचा आतून हायड्रेट राहण्यासाठी त्यांना किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला द्या.

आहार

आहारात ऍटी-ऑक्सिडंट्स फळांचा समावेश करा.

झोप

त्वचा थकलेली दिसू नये यासाठी 8 तासांची झोप बाबांची होते का नाही हे नक्की पाहा..

हेही वाचा – डबल चीनमुळे बिघडतोय चेहऱ्याचा लूक? हे उपाय देतील परफेक्ट जॉ लाईन

Comments are closed.