या ट्रिक्सने घरात एकटा असलेल्या कुत्र्याला ठेवा बिझी





जर तुम्ही ऑफिसला गेल्यावर किंवा कामानिमित्त बाहेर गेल्यावर घरात कुत्र्याला एकट कसं ठेवायचं? ही चिंता तुम्हाला सतावत असेल तर त्याचे उत्तर आमच्याकडे आहे. कारण कुत्रा हा सामाजिक प्राणी आहेत. त्यामुळे मालक दिवसभर घराबाहेर असताना तो घाबरू शकतो, त्याला एकटेपणा जाणवू शकतो. पण खालील काही ट्रीक्स त्यांना आनंदी आणि व्यस्त ठेवण्यास मदत करू शकतात.

इंटरॅक्टिव्ह खेळणी द्या
ट्रीट-पझल, फूड-डिस्पेन्सिंग खेळणी कुत्र्याला मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवतात.

व्यायाम
ऑफिसला जाण्यापूर्वी कुत्र्याला फिरवून आणा किंवा त्याच्यासोबत खेळा. त्यामुळे त्याची ऊर्जा खर्च होईल आणि तो अधिक शांत राहील.

गाणी किंवा टीव्ही चालू ठेवा
मंद संगीत किंवा प्राण्यांसाठीचे टीव्ही कार्यक्रम काही कुत्र्यांना आरामदायी वाटू शकतात.

खिडकीजवळ जागा द्या
बाहेरचे दृश्य पाहणे कुत्र्यांसाठी मनोरंजनाचा एक चांगला मार्ग असू शकतो.

आरामदायी जागा
त्याच्या आवडीची चादर, बेड आणि पाणी नेहमी उपलब्ध ठेवा.

डॉग वॉकरची मदत घ्या
जर तुम्ही खूप वेळ घराबाहेर असाल, तर एखाद्या व्यक्तीकडून मधल्या वेळेत कुत्र्याला फिरवून आणणे उपयुक्त ठरू शकते.



Comments are closed.