योग, ध्यान आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी वेलनेस ट्रॅव्हलकडे पर्यटकांचा कल

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता ताण यापासून आराम मिळण्यासाठी लोक सुट्टया घेऊन फिरायला जातात. परंतू आता सुट्टी घेऊन फिरायला जाणं केवळ पर्यटनस्थळांना भेट देणं मर्यादित राहिलेले नाही. आता लोक मानसिक शांतता, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्ट्रेस फ्री होण्याकडे वळत आहे. यासाठी वेलनेस ट्रॅव्हल केलं जात आहे. योग, ध्यान, आयुर्वेद, निसर्गसान्निध्य आणि डिजिटल डिटॉक्स अशा गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

सध्या पर्यटक अशा ठिकाणांना पसंती देत आहेत, जिथे त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहून स्वत:ला रिलॅक्स करता येईल. यामध्ये प्रामु्याने योग साधना, ध्यानधारणा, आयुर्वेदिक उपचार, निसर्गोपचार आणि स्पा थेरपी यांचा समावेश असलेल्या ठिकाणांमा मोठी मागणी आहे.

यामागील कारणे –

  • लोक गॅजेट्सपासून दूर राहण्यासाठी निसर्गाचा आसरा घेत आहेत.
  • पर्यटन करताना शुद्ध, सात्विक आहाराचा आस्वाद घेणे.

हेही वाचा – International Yoga Day : शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य निरोगी ठेवणारा योगाभ्यास

  • आजची पिढी आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता आरोग्यासाठीसुद्धा केला जात आहे.

वेलनेस पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे –

  • गंगेच्या किनाऱ्यावर वसलेले ऋषिकेश शहर ध्यानधारणा, योग आणि अध्यात्मिक शांततेसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक आश्रम आहेत.
  • केरळ हे आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांचे मुख्य केंद्र आहे. येथील हिरवळ मनाला प्रचंड शांतता देतात.
  • गोकर्ण येथील समुद्रकिनारे आणि तिथले शांत वातावरण योग शिबिरांसाठी लोकप्रिय आहे.
  • लोणावळा आणि खंडाळा या हिल स्टेशनवर अनेक वेलनेस रिसॉर्ट्स आणि निसर्गोपचार केंद्रे आहेत.
  • इगतपुरी येथील धम्म गिरी हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले विपश्यना क्रेंद आहे. मनाचा ताण कमी करण्यासाठी हे उत्तम पर्याय आहे.

एकंदरीत, मज्जा मस्तीसह आरोग्य जपणारे हे पर्यटन आजच्या काळाची गरज बनले आहे.

हेही वाचा – फक्त 5 मिनिटांचा फुट मसाज ठरू शकतो दिवसाचा ‘स्ट्रेस बस्टर’

Comments are closed.