100 भाज्यांसाठी, 1 वाटप, ते ही कांदा लसूण नसलेलं
आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा वेगवेगळ्या रेसिपी ऑर्डर करतो. पण बहुतेकवेळा काही रेसिपींची चव आणि लूक एकसारखाच असतो. पण त्यात टाकलेल्या भाज्या फक्त वेगळ्या असतात. हे सगळ एवढ हॉटेलवाल्यांना कसं काय जमतं. प्रत्येक भाजीसाठी वेगळा मसाला कमी वेळात कसा काय तय़ार केला जातो. असा प्रश्न आपल्याला पडतोच. पण तुम्हाला माहीत आहे का की या सगळ्या भाज्यांसाठी लागणारं वाटप आधीच तयार करून फ्रिजमध्ये स्टोअर केललं असतं. त्यामुळे तुम्ही ऑर्डर कराल तो पदार्थ काही वेळातच तुमच्यासमोर हजर असतो. आज आपण हॉटेलचं हेच सिक्रेट काय ते बघणार आहोत.
कधी कधी कांदा लसणाचे वाटप असेलेल साधं जेवणही रुचकर आणि चवीष्ट लागतं. ही चव कांदा लसणामुळे मसाल्यात असल्याचे अनेकांना वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की हॉटेलमध्ये आपण ज्या भाज्या चवीने खातो त्यात बऱ्याचवेळा कांदा लसूणच नसतो. पण तरीही त्या डिशेस अफलातून लागतात. आज आपण झटपट होणार हॉटेलमध्ये वापरल जाणारं विना कांदा लसणाचं वाटप कसं बनवायचं आणि कोणत्या भाज्यांसाठी ते वापरू शकतो ते बघूया.
साहीत्य-
तेल ५ चमचे,तेज पत्ता १, दही अर्धा कप, लवंग ३-४, जावित्री १, काळी वेलची १, ३ हिरवी वेलची, दालचिनी १ तुकडा, जीरे १ चमचे, टॉमेटो ३-४, चवीनुसार मीठ, आलंयाचा तुकडा, , लाल सुकलेली मिरची ३-४, कोथिंबीर, पाव कप भिजवलेले काजू, देशी तूप ३ चमचे, १ चमचा हळद पावडर,कश्मीरी लाल मिरची १ चमचा, धने पावडर २ चमचा, पाव चमचा हींग, कसूरी मेथी पाव चमचा, आमचूर पावडर १ चमचा, गूळ पावडर ३ चमचे.
कृती- सर्वप्रथम एका कढईत ३-४ चमचे तेल गरम करा, त्यात देशी तूप टाका, गरम झाल्यावर त्यात जीरे, खडा मसाला, तेज पत्ता,लवंग, जावित्री,मसाले वेलची,हिरवी वेलची, दालचिनी , काली मिरी टाकून खमंग परतून घ्या. नंतर त्यात आलं टाका.लाल मिरची, काजू टाका, दही घ्या. त्यात लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि धने पावडर टाकून मिश्रण एकजीव करा. त्यात टॉमेटो टाका. मीठ टाका. सर्व पदार्थ मऊ होईपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर मिक्समध्ये पेस्ट करा. तेल गरम करून त्यात मिक्सरमधील पेस्ट तेल सोडेपर्यंत परतून घ्या. पेस्ट तेल सोडताना त्यात आमचूर पावडर, गूळ, कसूरी मेथी टाका, ५ मिमिट झाकण लावून शिजवा. हा मसाला वाटप थंड झाल्यावर एका डब्यात भरून फ्रीजमद्ये ठेवा. दोन महिने हे वाटप ताजे राहते. यात तुम्ही वेगवगेळे १०० पदार्थ बनवू शकता.
यात तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या, चिकनही बनवू शकता.
Comments are closed.