जुन्या स्मार्टफोनपासून बनवा सीसीटीव्ही कॅमेरा





जर तुमच्याकडे एक्स्ट्रा जुना स्मार्टफोन पडून असेल किंवा तो फेकून द्यायचा तुम्ही विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा तुम्ही स्मार्टवापर करून त्यापासून सीसीटीव्ही बनवू शकता. त्यासाठी जुन्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला सेटींग करावी लागेल आणि एका अॅपची मदत घ्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या घराची आणि ऑफिसची सुरक्षा हाच जुना स्मार्टफोन स्मार्ट कॅमेरा बनून सीसीटीव्हीच काम करेल. त्यासाठी काय करायचं ते बघूया.

सगळ्यात आधी तुमच्या जुन्या स्मार्टफोनला सीसीटीव्ही बनवण्याआधी त्यात असलेले सगळे अॅप डिलिट करा. किंवा रिसेट करा.त्यानंतर फोन वाय फायशी कनेक्ट करा. स्मार्टफोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोन नीट काम करतोय का ते चेक करा.

२-जुन्या स्मार्टफोनला कॅमेरा बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक सिक्युरिटी कॅमेरा अॅपची गरज पडेल. बाजारात असे अनेक अॅप उपलब्ध आहेत. यातील काही अॅप मोफत बेसिक सुविधाही देतात. एकदा अॅप इंन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या जुन्या फोनला कॅमेरा डिवाईस आणि तुम्ही वापरत असलेल्या फोनला व्युअर डिवाईसने सेट करा.

3. सिक्युरिटी कॅमेरा अॅप इन्सटॉल केल्यानंतर दोन्ही डिवाईसवर एकाच अकाऊंटने लॉगिन करा. त्यानंतर जुना फोन कॅमेऱ्याप्रमाणे काम करू लागेल आणि तुम्ही वापरत असलेला फोन लाईव्ह व्हिडीओ दाखवण्यासाठी उपयोगी येईल. हा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठुनही तुमच्या ऑफिस , घरात काय सुरू आहे ते लाईव्ह पाहू शकता.

4. जुन्या फोनला कॅमेरा बनवणे पुरेसे नसून तो योग्य ठिकाणी ठेवणेही महत्वाचे आहे. जुना फोन अशा ठिकाणी ठेवावा ज्यामुळे घरातील आणि ऑफिसमधील हालचाली सहज टिपता येतील. जसे की घराचे प्रवेश द्वार, ड्राईंग रुम, पार्किंग, बाल्कनी यासारखी ठिकाणे कॅमेऱ्यात सहज टिपली जातील. जर तुम्ही उंचावर पोन ठेवलात तर सगळा एरिया कव्हर होऊ शकतो.

५. जुना स्मोर्टफोन फक्त व्हिडीओज रेकॉर्ड नाही तर करत तर आजूबाजूचा आवाजही कॅप्चर करतो. यात काही अॅपमद्ये टू वे ऑडियो फीचरही उपलब्ध असतात. ज्याच्या मदतीने तुम्ही दुसऱ्याव्यक्तीशी बोलू शकता. या फिचरचा उपयोग घरातील ज्येष्ठ किंवा लहान मूलांची देखभाल करण्यासाठी असलेल्या केअर टेकर किंवा स्टाफबरोबर बोलण्यासाठी होतो.



Comments are closed.