बेली फॅट लपवण्यासाठी महिलांमध्ये कॉर्सेट ब्लाउजची क्रेझ
अनेक महिलांना साडी नेसायला आवडते. परंतू बेली फॅट दिसत असल्याने साडी नेसणं टाळलं जातं. कित्येक महिलांचं तर साडी नेसल्यावर कंबरेच्या भागातून पोट आलेलं दिसतं, ज्यामुळे पूर्ण लूक खराब होतो. पोटाचा हा घेर दिसू नये यासाठी बॉडी शेपरचा वापर करण्यात येतो. पण तो तासनतास घालणं शरीरावर वाईट परिणाम करणारं ठरू शकतं. अशावेळी तुम्ही साडी घालणं टाळण्यापेक्षा स्मार्ट पद्धतीने विचार करायला हवा. आज आम्हीतुम्हाला अशा प्रकारचा ब्लाउज सांगणार आहोत ज्यातून बेली फॅट सहजपणे लपवता येते.
कॉर्सेट ब्लाउज
बेली फॅट लपवण्यासाठी तुम्ही कॉर्सेट ब्लाउज घालायला हवं. हे ब्लाउज फक्त दिसायला छान दिसत नाही तर शरीराला विशिष्ट आकार देतात.
लाँग लाईन कॉर्सेट
लाँग लाईन कॉर्सेट ब्लाउज नेहमीच्या ब्लाउजच्या लांबीला थोडा जास्त असतो. या ब्लाउजमुळे बरगड्यांपासून पोटाच्या खालच्या भागापर्यंत झाकला जातो, ज्यामुळे सुटलेलं पोट दिसून येत नाही.
हेही वाचा – वटपौर्णिमेला साडीवर शोभून दिसतील हे पारंपरिक मराठमोळे दागिने
पेप्लम स्टाइल कॉर्सेट
पेप्लम स्टाईल कॉर्सेट ब्लाउजला थोडा घोळ असतो. या आकारामुळे लोअर बेली फॅट दिसून येत नाही.
व्ही कट हेमलाईन कॉर्सेट
व्ही कट हेमलाईन कॉर्सेट ब्लाउज व्ही शेप मध्ये असतो. यामुळे कंबर बारीक दिसते.
बेल्ट कॉर्सेट ब्लाउज
बेल्टेड कॉर्सेट ब्लाउजमध्ये साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालता जातो. बेल्टमुळे कंबरेला आकार मिळतो आणि साडीचा पदरही व्यवस्थित राहतो.
हेही वाचा – कधीही आऊट डेटेड न होणाऱ्या साड्या
Comments are closed.