नॅचरल ग्लोसाठी आलिया आठवड्यातून 4 दिवस लावते हा फेसपॅक




आलिया भट्ट स्किन केअर रूटीन


बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या नो मेकअप लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. ती कोणताही मेकअप न करता तिची त्वचा नितळ, गुलाबी दिसते. अनेकांना वाटतं यामागे ती कायम महागड्या ट्रिटमेंट्स घेत असेल पण हे खरं नाही. आलिया भट नॅचरल ग्लोसाठी स्किन केअर रूटीनमध्ये घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यावर भर देते. आज आपण त्वचेचं सौदर्य जपण्यासाठी आलिया कोणता घरगुती फेसपॅक लावते, काय काळजी घेते हे जाणून घेऊयात.

साहित्य –

  • पपईची पावडर – 1 चमचा
  • संत्र्याच्या सालीची पावडर – 1 चमचा
  • गुलाब पाणी – आवश्यकतेनुसार

हेही वाचा – Ice Facial : आईस फेशिअलने चाळिशीनंतरही चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक ग्लो

कृती –

  • सगळ्यात आधी एका स्वच्छ वाटीत पपईची पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करा.
  • यात गरजेनुसार गुलाब पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या.
  • फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा माईल्ड फेसवॉशने धुवून घ्या.
  • मऊ कापडाने चेहरा कोरडा करा.
  • तयार फेसपॅक गळ्यापासून संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्या.
  • 15 ते 20 मिनिटं हा पॅक सुकू द्या.
  • पॅक सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करत चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
  • चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायजर नक्की लावा.

फायदे –

पपईत पपेन नावाचे एन्झाइम्स असते, ज्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन निघते.
संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी असते, ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग, पिग्मेंटेशन दूर होते.

हेही वाचा – Lip Balm : डाळिंबापासून बनवा घरगुती लिप बाम



Comments are closed.