Clothes Washing : हे 6 कपडे रोज धुताय? मग आधी हे वाचा
अनेकांच्या घरात एक सवय हमखास दिसते एकदा कपडा घातला की तो थेट धुण्याच्या भांड्यात जातो. स्वच्छता महत्त्वाचीच, पण प्रत्येक कपडा प्रत्येक वापरानंतर धुणे गरजेचे नसते. उलट काही कपडे वारंवार धुतल्यामुळे त्यांचा रंग फिका होतो, फॅब्रिक कमकुवत होतं आणि कपड्यांचं आयुष्यही कमी होतं. योग्य काळजी घेतली तर कपडे जास्त काळ नवीनसारखे राहू शकतात.
1) जीन्स
डेनिमचे कापड मजबूत असते आणि ते घाम कमी शोषते. जीन्सवर डाग नसतील किंवा दुर्गंधी येत नसेल तर ती 2 ते 4 वेळा वापरल्यानंतर धुणे पुरेसे ठरते. त्यामुळे तिचा रंग आणि फिटिंग अधिक काळ टिकून राहते.
2) स्वेटर आणि कार्डिगन
हे कपडे बहुतेक वेळा इनर किंवा टी-शर्टवर घातले जातात. त्यामुळे त्यांचा त्वचेशी थेट संपर्क कमी होतो. साधारण 5 ते 7 वेळा वापरल्यानंतर धुतल्यास त्यांचा आकार आणि मऊपणा टिकून राहतो.
3) जॅकेट आणि ब्लेझर
ऑफिस, प्रवास किंवा खास प्रसंगी वापरले जाणारे जॅकेट आणि ब्लेझर रोज धुण्याची गरज नसते. वारंवार धुतल्यास त्यांची फिनिश आणि आकार बिघडू शकतो. गरजेनुसार किंवा हंगाम संपल्यानंतर स्वच्छ करणे अधिक योग्य ठरते.
4) ट्राउजर आणि फॉर्मल पँट
फॉर्मल पँट वारंवार धुतल्याने तिची क्रीज आणि फिटिंग खराब होण्याची शक्यता असते. डाग किंवा दुर्गंधी नसल्यास काही वेळा वापरल्यानंतर धुणे योग्य मानले जाते.
5) नाईटसूट किंवा पायजमा
जर झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय असेल आणि जास्त घाम येत नसेल, तर नाईटसूट 3 ते 4 वेळा वापरल्यानंतर धुतला तरी चालतो. मात्र उन्हाळ्यात किंवा जास्त घाम आल्यास तो लवकर धुणे आवश्यक आहे.
कपडे जास्त काळ टिकवायचे असतील तर…
कपडे धुण्यापूर्वी ते खरोखरच धुण्याची गरज आहे का, याचा विचार करा. प्रत्येक फॅब्रिकची निगा वेगळी असते. कपड्यावरील केअर लेबल वाचून त्यानुसार धुणे, सुकवणे आणि साठवणे हीच कपडे नव्यासारखे ठेवण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे.
Comments are closed.