देशात EV चे मार्केट वाढतंय, बड्या कंपन्यांच्या या गाड्यांची जोरदार चर्चा
मुंबई : गेल्या काही काळापासून देशात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई होत असल्याचे दिसून आले. बाहेरील देशांमधील युद्ध आणि अस्थिरता यामुळे पेट्रोल, डिझेलसह सीएनजी गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनिक गाड्या म्हणजेच ईव्ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 2026 या वर्षात 19 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. इंधनाचे वाढते दर, पर्यावरणपूरक पर्याय आणि सरकारी अनुदानामुळे लोक इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत असल्याचे समोर आले आहे. तसेच, बाजारामध्ये अनेक बड्या कंपन्या आपल्या नवनवीन EV गाड्या समोर आणत असून मार्केटमध्ये एक उत्सुकता दिसून येत आहे.
Comments are closed.