दमट वातावरणात मसाले खराब होण्याची भीती? वापरा या स्मार्ट ट्रिक्स
गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात सतत बदल होत आहे. अशा बदलत्या वातावरणात अनेकवेळा किचनमधील मसाले लवकर खराब होतात. पावसाळ्यातील दमट हवेमुळे मसाल्यांना बुरशी लागणे, ते ओलसर होणे किंवा त्यांचा सुवास कमी होणे अशा समस्या अनेकदा उद्भवतात. त्यामुळे अशा वातावरणात दमट मसाले खराब होऊ नये यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स पाहूयात,
- मसाल्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा साध्या डब्यात ठेवण्याऐवजी एअर टाईट काचेच्या बरण्यांमध्ये भरा. यामुळे बाहेरील ओलसर हवा मसाल्यांच्या संपर्कात येत नाही.
- मसाल्यांच्या डब्यात कधीही ओला चमचा टाकू नये, यामुळे मसाले खराब होतात. मसाले काढताना नेहमी कोरडा व स्वच्छ चमचा वापरा.
हेही वाचा – Shoe Box Reuse : रिकामे शू बॉक्स फेकण्यापूर्वी घरातच करा स्मार्ट उपाय
- मसाल्यांचे डबे गॅस स्टोव्ह, सिंक किंवा वाफेच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या.
- मसाले खूप जास्त प्रमाणात खरेदी करू नका.
- लवंग, मिरी यांना कीड लागू नये यासाठी त्यात थोडं खडे मीठ टाकून ठेवू शकता.
- डब्याच्या तळाशी 2 ते 3 लवंगा टाकून ठेवल्यास लागणारी कीड रोखता येते.
- मसाले फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे, कारण बाहेर काढल्यावर तापमानातील बदलामुळे त्यात ओलावा तयार होऊ शकतो.
- दमट वातावरण जाणवू लागल्यास खडे मसाले (धने, जिरे, मिरी) कढईत हल्केसे कोरडे भाजून घ्या आणि थंड झाल्यावरच बरणीत भरा. यामुळे त्यातील ओलावा निघून जातो.
एक लक्षात घ्या खराब झालेले मसाले केवळ अन्नाची चवच बिघडवत नाहीत, तर आरोग्यावरही दुष्परिणाम करतात. त्यामुळे मसाले खराब झाल्याची कोणतीही चिन्हे दिसल्यास ते ताबडतोब बदलणे उत्तम ठरेल.
हेही वाचा – Water Safety : पावसाळ्यात पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘ही’ पद्धत
Comments are closed.