मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पहिल्या पायरीला स्पर्श का करावा?
आपण कोणत्याही मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम चपला, बूट बाहेर काढतो. पाण्याने पाय स्वच्छ पाय धुतो आणि मंदिराच्या प्रवेशाकडे निघतो. मंदिराच्या दारात पोहोचताच आपसूकच आपले हात मंदिराच्या पहिल्या पायरीकडे वळतात. आपण खाली वाकतो आणि पहिल्या पायरीला स्पर्श करतो म्हणजेच पहिल्या पायरीला नमस्कार करतो आणि तो हात आपल्या कपाळाला किंवा डोळ्यांना लावतो. मंदिरात प्रवेश करताना पायरीवर वाकून नमस्कार करणं ही एक प्रथा आहे, श्रद्धा देखील आहे. पण यामागचं कारण काय आहे, समजून घेऊयात
हिंदू धर्मानुसार, मंदिर हे एक पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले स्थान आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर, मन आणि आत्मा पूर्णपणे शुद्ध आणि भक्तीने परिपूर्ण असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पहिल्या पायरीला स्पर्श करते, तेव्हा ते दैवी आदराचे प्रतीक मानले जाते.
जेव्हा तुम्ही पहिल्या पायरीला स्पर्श करता तेव्हा असे दर्शवते की तुम्ही नकारात्मक ऊर्जा मागे सोडून मंदिराच्या आवाराच्या प्रवेश करण्यात तयार आहात.

यामागे असाही अर्थ सांगितला जातो की, जेव्हा तुम्ही पहिल्या पायरीला हात लावता तेव्हा तुम्ही ईश्वराच्या चरणांना स्पर्श करता.

मंदिरात पाय ठेवण्यापूर्वी आपण हाताने स्पर्श करून देवाकडे क्षमा मागतो आणि त्यांच्या परवानगीनेच मंदिरात प्रवेश करतो, हा यामागील मुख्य आध्यात्मिक भाव सांगितला जातो.

आपण पहिल्या पायरीला हात लावल्यानंतर आपण डोक्याला हात लावतो. ज्यामुळे आज्ज्ञा चक्राला स्पर्श होतो. असे केल्याने डोक्यातील विचार शांत होतात आणि मन एकाग्र होते.
हेही वाचा – महाराष्ट्रातील या गावात होते दुर्योधनाची पूजा
Comments are closed.