मुसळधार पाऊस अन् वादळी वारे, मुंबईत झाडांची पडझड झाल्याने मोठे नुकसान
मुंबई : सोमवार 29 जूनपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. आगामी काळातही पाऊस असाच सुरु राहणार असून हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्टही दिला आहे. रविवारी (5 जुलै) सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत 77 किमी प्रतीतास वेगवान वाऱ्यासह पाऊस पाडला. त्यामुळे अनेक ठिकाणी घरे, दरड कोसळणे, झाडे/फांद्या यांच्या पडझडीच्या घटना घडल्या. फक्त 5 तासांत म्हणजेच सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 142 ठिकाणी झाडे/फांद्यांची पडझड झाली.
Comments are closed.