रात्रीच्या या सवयींमुळे मिळेल उत्तम झोप
दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे हल्ली रात्री शांत झोप न येणे ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा अंथरुणावर पडल्या पडल्या तासनतास डोळा लागत नाही किंवा रात्री वारंवार झोपमोड होते. परिणामी याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. तुम्हाला अशा निद्रानाशेचा त्रासापासून सुटका हवी असल्यास तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी काही सवयी अंगी बाळगायला हव्यात. जाणून घेऊया रात्रीच्या अशा काही सोप्या आणि निरोगी सवयी, ज्या अंगीकारल्यास रात्री अगदी काही मिनिटांत तुम्हाला झोप येईल. good sleep tips
वेळेचे नियोजन
दररोज रात्री एकाचवेळी झोपण्याची सवय लावावी. यामुळे शरीराचे नैसर्गिक चक्र सुरळीत राहते. परिणामी, रात्री चांगली झोप लागते.
हेही वाचा – घरात मान्सून इमर्जन्सी किटमध्ये काय असावे?
स्क्रीनपासून दूर राहा
झोपण्याच्या किमान 1 ते 2 तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणे बंद करा. कारण, या उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश झोपेच्या संप्रेरकांवर वाईट प्रभाव पाडतो. ज्यामुळे झोपेत व्यत्यय निर्माण होतो.
हलके जेवण
रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्याच्या किमान 2 तास आधी करावे. झोपण्यापूर्वी चहा, कॉफी, चॉकलेट आणि मद्यपान करणे टाळावे, कारण हे पदार्थ झोपेवर परिणाम करतात.
आरामशीर वातावरण
झोपण्याची जागा शांत, गडद असावी. आवश्यक असल्यास तुम्ही गाणी ऐकू शकता किंवा पुस्तकांची आवड असेल तर तेही वाचू शकता.
कोमट पाण्याने अंघोळ
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास किंवा हात पाय धुतल्यास शरीराचे तापमान कमी होते आणि तुम्हाला शांत झोप लागेल.
हेही वाचा – आजीचे पावसाळ्यातील घरगुती उपाय आजही का लोकप्रिय
Comments are closed.