मुसळधार पावसामुळे वारंवार लाईट जाते? हे गॅजेट्स ठरतील उपयोगी
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या वाढतात. काही वेळा तर तासनतास किंवा दिवसभर लाईट नसते. अशा वेळी घरात अंधार तर होतोच, पण मोबाईल चार्जिंग, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे काम आणि घरातील लहान मुलांची गैरसोय होते. सध्या वसई विरार या भागातील परिस्थिती अशीच आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वीज खंडीत आहे. जर तुम्हीही पावसाळ्यात वारंवार लाईट जाण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर काही गॅजेट्स तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतात.
इन्व्हर्टर एलईडी बल्ब
हे बल्ब दिसायला एलईडी बल्बसारखेच असतात. पण यामध्ये इन-बिल्ट बॅटरी असते. जेव्हा लाईट असते, तेव्हा हा बल्ब आपोआप चार्ज होतो आणि लाईट गेल्यावर लगेचच पॉवर बॅकअप मोडवर जातो.
सौर कंदील
चार्जिंगची झंझट नको असेल तर सोलान लॅटर्न वापरू शकता. हा एक पर्यावरणपुरक पर्याय आहे.
रिचार्जेबल फॅन
घरी लहान मुलं असेल तर रिचार्जेबल फॅन मोठा दिलासा देऊ शकतं.
हाय-कॅपेसिटी पॉवर बँक
आपत्कालीन परिस्थितीत संपर्कात राहण्यासाठी फोन चालू असणे गरजेचे आहे. म्हणूनच पावसाळ्यात तुमच्याकडे किमान १०,००० ते २०,००० mAh क्षमतेची पॉवर बँक असणे अत्यंत आवश्यक आहे.
मिनी यूपीएस
लाईट गेल्यावर राउटर बंद पडतो आणि इंटरनेट कनेक्शन तुटते. या समस्येवर Mini UPS हा उत्तम उपाय आहे. हे एक लहान पॉवरबँकसारखे डिव्हाइस असते जे थेट वाय-फाय राउटरला जोडता येते.
पोर्टेबल पॉवर स्टेशन
लॅपटॉप, वायफाय राउटर, पंखा यांसारखी वाहने चालवण्याकरता पोर्टेबल पॉवर स्टेशन उपयुक्त ठरेल.
सध्या जोरदार पाऊस सर्वत्र सुरु असल्याने लाईट्चा प्रॉब्लेम सर्वत्र सुरू आहे. अशावेळी ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी तुम्ही पॉवर कटची तयारी आधीच करू शकता. असे केल्याने मोबाईल, इंटरनेट आणि आवश्यक उपकरणे मुसळधार पावसातही वापरू शकता.
हेही वाचा – पावसाळ्यात कपाट उघडताच येतोय कुबट वास? वापरा सोप्या टिप्स
Comments are closed.