अमित शाह घामाघूम, लहान जय शाहांना घेऊन मातोश्रीवर; बाळासाहेबांना म्हणाले, ‘आप बात करेंगे तो न्य

संजय राऊत पुस्तक नरकटला स्वर्ग: कारागृहात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लिहिलेलं ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक (Narkatla Swarg) एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. संजय राऊतांनी या पुस्तकांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना कसं वाचवलं?, याबाबत खळबळजनक दावा केला आहे. तसेच या पुस्तकांत बाळासाहेबांनी अमित शाहांवर उपकार केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

काळी-पिवळी टॅक्सी पकडून अमित शाह मातोश्रीवर-

नरकातला स्वर्ग या पुस्तकात पुढे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेली मदत त्याची विस्तृत माहिती संजय राऊत यांनी मांडली. संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता. परंतु ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिला. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली. अमित शाह यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केली. अमित शाह गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शाह यांना मदत करता येत नव्हती. अमित शाह गुजरात मधून तडीपार होतेच. सीबीआयने फास आवळल्याने अमित शाह यांच्या  तात्पुरत्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अडचणीत अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शाह यांना कोणीतरी सुचवले. एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शाह यांना घेऊन मुंबई विमानतळ उतरले आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते बांद्राच्या दिशेने निघाले. मात्र मातोश्रीच्या आणि कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याने कलानगरचे मुख्य गेटवरच अमित शाह यांना अडवून ठेवण्यात आले. कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती. अमित शाह घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते. दुसऱ्या दिवशी अमित शाह पुन्हा एकदा मातोश्रीवर आले. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शाह हे मातोश्रीवर गेले.

अमित शाह दर्दभारी कथा सांगत महनाले, जर तुम्ही बोललात तर …

गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी रोमांचक कहानी शिवसेनाप्रमुखांना सांगितले . “मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे तडीपारी आहे वगैरे…” अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. त्यानंतर अमित शाह बाळासाहेब यांना म्हणाले.” आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे…तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत” त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून अमित शाह यांचे प्रकरण ज्यांच्याकडे होते त्यांना फोनवरून बोलले आणि त्यांचे शेवटचे “तुम्ही कोणतेही पदावर बसलेले असा पण तुम्ही ही हिंदू आहात हे विसरू नका”…बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शाह यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासतल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या. त्यामुळे त्यानंतर अमित शाहा यांनी पुढे काय केलं हे साऱ्या जगाने पाहिलं आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी ते  निर्घृणपणेचं वागण्याची भावना या पुस्तकातून संजय राऊत यांनी व्यक्त केली. ईडी कोठडी संपून न्यायालय कोठडी म्हणजे आर्थर ऊर्जेच्या दिशेने जाताना संजय राऊत आणि हे सगळं आठवड्याचं  या पुस्तकात सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=fe5i-yo_jru

संबंधित बातमी:

Sanjay Raut Book Narkatla Swarg: बाळासाहेब ठाकरेंनी अमित शाहांना कसं वाचवलं?; संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

अधिक पाहा..

Comments are closed.