मोठी बातमी: रामराजेंच्या चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले, मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीचा वाद, सा

जयकुमार गोरे वि रामराजे नाईक निम्बालकर: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस (Vaduj Police) माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल  झाले आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समन्स बजावले होते. संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू केली आहे, वडूज पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजे यांच्यासह 11 जणांना समन्स बजावले आहे. या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. या प्रकरणातील संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते. मला गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. ज्यावेळी मला पत्र आलं त्यावेळी मी त्रास होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून याबाबतची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना घटनेबाबत सांगितली. मात्र, त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही. माझी बदनामी होत असल्याचं त्या महिलेने म्हटलं होतं, यावरून मंत्री गोरेंना विरोधकांनी धारेवर धरलं होतं, त्यानंतर या प्रकरणात कारवाई करत संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या प्रकरणी ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तुषार खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडूज, दहवडी, म्हसवड, तलभीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला आहे.

गोरे यांनी यावर अधिवेशन चालू असताना स्पष्टीकरण दिलं होतं, “2017 साली माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे.” याप्रकरणी आता चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील समन्स पाठवण्यात आलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला, म्हणाले मला संपवता संपवता तेच घरी बसले

अधिक पाहा..

Comments are closed.