केवळ 5 दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 3500 रुपयांची पडझड; कारणं काय? आज 10 ग्रॅममागे किती पैसे

सोन्याच्या किंमती भारत: एप्रिल महिन्याच्या शेवटी लाखांचा टप्पा ओलांडलेल्या सोन्याचांदीच्या भावात गेल्या दोन आठवड्यांपासून मोठे चढउतार होत आहेत. आधी भारत पाकिस्तान युद्धामुळे सोन्याचे वर गेलेले भाव युद्धबंदीच्या शक्यतेने घसरले. युद्ध संपते ना संपते तोच अमेरिकी व्यापारी धोरणाचाही सोन्याच्या दरांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसले. लाखाहून अधिक गेलेल्या सोन्याच्या किमतीत 12 ते 16 मे दरम्यान मोठी पडझड झाल्याचे दिसले. 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत तब्बल 35,500 रुपयांची तर 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3500 रुपयांची घसरण झालीय. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानं देशांतर्गत सोन्याच्या किमतींमध्ये मोठी पडझड झाली. शनिवारी सोन्याच्या किमतींमध्ये फारशी तफावत नव्हती. रविवारी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 92700 रुपये असून चांदी किलोमागे  95310 रुपयांवर गेलीय. पुढील ट्रेडिंग सत्रात, सोने 88,000- 95000 रुपयांवर राहण्याची शक्यता आहे. तर चांदी 91000-98000 च्या वर ट्रेड करू शकतात. (Gold Silver Prices)

सोन्याचे भाव का घसरले?

गुड रिर्टन्सच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोन्याच्या किमतीत 3.5 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर चांदीच्या किमतीत 1 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. जागतिक व्यापार तणाव कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांमध्ये सोने-चांदी खरेदीबाबत चांगली भावना निर्माण झाल्यामुळे ही घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे.

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धात 90 दिवसांचा ब्रेक लागल्याने सोन्याच्या किमती घसरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दोन्ही देशांमधील या करारात अमेरिकेने चिनी वस्तूंवरील शुल्क 145 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर आणले आहे.तर चीनने अमेरिकन आयातीवरील कर 125 टक्क्यांवरून 10 टक्के केला आहे. हे पाऊल व्यापार युद्ध कमी करण्यासाठी दोन्ही देशांमधल्या कराराचे प्रतिबिंब असल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारामुळेही सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

देशातील सोन्याचा भाव

17 रोजी देशात 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत 9,51,300 रुपये होती. 18 कॅरेट सोन्याच्या त्याच संख्येच्या ग्रॅमची किंमत 7,13,500 रुपये होती आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,72,000 रुपये होती. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 95130  रुपये नोंदली गेली.

17  मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 87200 रुपये होती आणि 18 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71350 रुपये होती. 18 मे रोजीही सोन्याच्या किमतीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

किती घसरण झाली आहे?

12 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमच्या किमतीत 32200 रुपयांची घसरण झाली होती,

14 मे रोजी 5400 रुपयांची घसरण झाली होती आणि 15 मे रोजी 21300 रुपयांची घसरण झाली होती.

13 मे आणि 16 मे रोजी 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 11400 रुपये आणि 12000 रुपयांची वाढ झाली.

एकूणच या आठवड्यात मे 2025 मधील सर्वाधिक विक्री देखील झाली. त्यानुसार, 12 मे ते 16 मे या कालावधीत 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 35500  रुपयांची आणि 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3550 रुपयांची घट झाली. एकूणच, मे महिन्यात सर्व कॅरेटच्या सोन्याच्या किमती 1 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

सोन्याचे नवीनतम भाव

मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 92700 रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 8497 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 69525 रुपये आहे.

सध्या देशात 1 किलो चांदीची किंमत 95310 रुपये आहे. तर 10 ग्रॅम आणि 100ग्रॅम चांदीची किंमत अनुक्रमे 953 रुपये आणि 9530 रुपये आहे.

हेही वाचा:

Gold Price:  अमेरिका-चीनमुळं सोन्याचे दर घसरले, 10 ग्रॅम सोनं 85 हजारावर येणार का? जाणून घ्या

अधिक पाहा..

Comments are closed.