शिवराज दिवटेला मारहाण होण्याआधीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; शिवराजच्या मित्रांनी केलेली मारहाण क
बीड: परळीच्या टोकवाडी परिसरात लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे याला दोन दिवसापूर्वी अमानुष मारहाण झाली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सात आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर मात्र बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. आता याच प्रकरणातील दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवराज दिवटे याच्या मित्रांनी परळी शहरातील समाधान मुंडे याला मारहाण केली होती. 16 मे रोजी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ही मारहाण झाली. त्यानंतर समाधान मुंडे याच्या मित्रांनी मिळून शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केली. समाधान मुंडे याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील तरुणांमधील किरकोळ वाद किती टोकाला पोहोचल्याचे दिसून आले .दिवटे याला झालेली मारहाण किरकोळ वादातून झाल्याचे पाहायला मिळते आहे.
नेमकं काय घडलं?
परळीतील गुन्हेगारांच्या एका टोळक्याने आपल्या भांडणात सहभागी असल्याच्या संशयावरून एका तरुणाला उचलून जवळच्या जंगलात नेले. तेथे त्याला 13 ते 14 जणांनी लाठ्याकाठ्या, बेल्ट, रॉडने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी परळीजवळील रत्नेश्वर मंदिराच्या आवारातील जंगलात घडली. विषेश म्हणजे आरोपींनी या मारहाणीचा व्हिडीओही बनविला. शिवराज नारायण दिवटे (वय 18) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी आंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील पाच आरोपींना 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे. रोहित मुंडे (रा. डाबी), प्रशांत कांबळे (रा. परळी), सुरज मुंडे (रा. टोकवाडी) व स्वराज गित्ते (रा. परळी) यांच्यासह अनोखळी दहा आरोपी फरार आहेत.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात भेट
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिवराज दिवटे याची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात भेट घेतली. शिवराज दिवटे याला परळी येथे दोन दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. जखमी असलेल्या शिवराज दिवटेवर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत. दिवटे याची भेट घेऊन ते त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. भेटीदरम्यान शिवराज दिवटे यांच्या कुटुबीयांशी चर्चा जरांगे पाटील यांनी केली. धनंजय देशमुख देखील यावेळी उपस्थित होते. आज सकाळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शिवराज दिवटे याची भेट घेतली होती, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिवटे याची भेट घेतली.
मारहाण प्रकरणी उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या (सोमवारी) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. उद्याचा बंद हा शांततेत होणारा असून हा बंद कोणा एकाचा नाही. शांतता प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला आहे. शांततेच्या मार्गाने शिवराज दिवटे याला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत असे व्हिडिओ व्हायरल होणे थांबले पाहिजे. यामुळे बीडची तुलना बिहार शी केली जात आहे हे थांबल पाहिजे म्हणून उद्याचा बंद आहे. बीड जिल्ह्याचे नाव खराब न होण्यासाठी आणि बीडची गुन्हेगारी थांबवण्यासाठी हा बंद करण्यात येणार आहे.गुन्हेगाराला कुठलाही जात धर्म नसतो म्हणून हा बंद आम्ही अठरापगड जातीचे लोक एकत्र येऊन करणार आहोत, अशी माहिती मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.
शिवराज दिवटेला मारहाण होण्याआधीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल… शिवराजच्या मित्रांनी केलेली मारहाण कॅमेरात कैद… #Beedcrimenews #क्रिमहेन्यूज #bunnews pic.twitter.com/arvdaacwlk
– अंकीता शांतीनाथ खाने (@khaneankita) मे 18, 2025
अधिक पाहा..
Comments are closed.