सलग पाच दिवस अप्पर सर्किट, ड्रोन कंपनीचा धमाका, स्टॉकमध्ये 5 दिवसात 400 रुपयांची वाढ
मुंबई : संरक्षण क्षेत्रातील कंपनी Zen Tech कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये या कंपनीच्या स्टॉकला सहज 5 दिवस अप्पर सर्किट लागत आहे. आज देखील झेन टेक्नोलॉजीच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं. गेल्या शनिवारी कंपनीनं त्यांच्या 2024-25 मधील चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. यानंतर शेअर बाजारात या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
भारतीय शेअर बाजारात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. मात्र, झेन टेक्नोलॉजीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाल्यानं अप्पर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर 1884.50 रुपयांवर पोहोचला आहे. तर, कंपनीचं बाजारमूल्य 16940 कोटींवर पोहोचलं आहे.
झेन टेक्नोलॉजीचा चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा 189 टक्क्यांनी वाढून 101 कोटी रुपये झाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 34.94 कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल मार्च तिमाहीत 129.8 टक्क्यांनी वाढून 324.97 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या वर्षी 141.39 कोटी रुपये झाला होता.
झेन टेक्नोलॉजीच्या शेअर गेल्या पाच दिवसात 400 रुपयांनी वाढला आहे. यामुळं गुंतवणूकदारांनी जोरदार कमाई केली आहे. झेन टेक त्याच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. या पाच वर्षात झेन टेकच्या गुंतवणूकदारांना 5063 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2627 रुपये तर नीचांक 893.95 रुपये आहे.
झेन टेक्नोलॉजी कंपनीची स्थापना 9 मार्च 2018 ला डेलावेअर, यूएसए कायद्यानुसार झाली होती. ही कंपनी सैन्य आणि सुरक्षा दलांसाठी लढाऊ प्रशिक्षण सिमुलेटर आणि यंत्रणा विकसित करण्यावर काम करते. लाइव्ह फायर, आभासी आणि क्रिएटिव्ह सोल्यूशन्समध्ये कंपनी काम करते. काऊंटर ड्रोन तंत्रज्ञानावर जोर देण्यात आला आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..
Comments are closed.