तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासली, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला, पुण्यातील गंभीर घटना, स
पुणे: पुण्यात अचानक तुटलेली केबल दुचाकी स्वराच्या मानेला घासून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सामान्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नांदेड सिटीकडून पुणे शहरात येताना अचानक तुटलेली केबल दुचाकी स्वराच्या मानेला घासून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुचाकी स्वराच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. ही केबल कोणाची होती आणि ती तिथे कशी आली याचं उत्तर नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. या बेकायदा केबल शहरातील सर्वच रस्त्यावर असलेले दुचाकी स्वारांसाठी पतंगाच्या मांज्यासारखा धोकादायक झाले आहेत. विश्व परदेशी असे जखमी झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे, या अपघातानंतर दुचाकीस्वार परदेशी यांनी महापालिकेच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.
केबल पतंगाच्या मांज्यासारखा धोकादायक असल्याचं चित्र
मिळालेल्या माहितीनुसार विश्व परदेशी हे नांदेड सिटीकडून शहरात दुचाकीवरून येत असताना अचानक तुटलेली केबल त्यांच्या मानेला घासली. यामध्ये परदेशी यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. ही केबल कोणाची आणि ती तेथे कशी आली, याचे उत्तर नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहेत. दरम्यान, या बेकायदा केबल शहरातील सर्वच रस्त्यांवर असल्याने दुचाकीस्वारांसाठी पतंगाच्या मांज्यासारखा धोकादायक असल्याचं चित्र आहे. शहरभरात जागोजागी अशा केबल टाकल्याचं दिसून येतं. या केबलमुळे आणि घडलेल्या या गंभीर घटनेमुळे सामान्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवली
विश्व परदेशी असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातानंतर दुचाकीस्वार परदेशी यांनी महापालिकेच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर एका महिला अधिकाऱ्यांने त्यांना संपर्क साधला. महापालिकेने ‘त्या भागात आमचे काम सुरू नाही,’ असे सांगून या प्रकरणापासून हात झटकले. सोमवारी महापालिका अधिकारी आणि जखमी दुचाकीस्वार यांनी घटनास्थळी पुन्हा पाहणी केली. त्यानंतरही यात महापालिकेचा काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. ‘रस्त्यावर उघडपणे केबलचे टाकणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे,’ असा प्रश्न परदेशी यांनी उपस्थित केला आहे.
विश्व परदेशी घटनेबाबत काय म्हणाले?
विश्व परदेशी स्वारगेटकडे जात होते. या घटनेनंतर, परदेशी यांनी पुणे महानगरपालिकेकडे (पीएमसी) ऑनलाइन तक्रार दाखल केली. शनिवारी संध्याकाळी नागरी अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली आणि परदेशी यांना कळवले की केबल्स पीएमसीचे नाहीत; त्या एका खाजगी वाय-फाय सेवा देणाऱ्या कंपन्यांनी बसवल्या आहेत अशी माहिती दिली. विश्व परदेशी यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, “शनिवारी सकाळी माझ्या कामासाठी बाहेर पडलो. काम पूर्ण केल्यानंतर, मी माझ्या स्कूटरवरून घरी परतत होतो. आनंदनगरमधील नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाखालून एक केबल लटकत होती. मी ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असताना, मला लटकणारा वायर लक्षात आली नाही. ती माझ्या मानेवर अडकली, आणि घासली गेली, ज्यामुळे मला गंभीर दुखापत झाली, कोणी अशी केबल कशी ठेवू शकते,” असा प्रश्न त्यांनी पुढे केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=olj6uxuiy1y
अधिक पाहा..
Comments are closed.