पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती म्हणजे CM फडणवीसांना चपराक : हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकल बुलधाना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आठवडाभरापूर्वी एका लग्न समारंभात बुलढाणा येथे आले होते आणि त्यानंतर आठवडाभरातच बुलढाण्याचे (Buldhana) कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक विश्व पानसरे (Vishwa Pansare) यांची बदली झाली. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. विश्व पानसरे हे अवघे नऊ महिनेच जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय व योजनाही सुरू केल्यात.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवैध धंदे त्यांनी सर्वत्र बंद केले आणि त्यामुळेच की काय देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले आणि त्यांच्या कानात जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बद्दल सांगितले, आणि त्यानंतर विश्व पानसरे यांची बदली झाली. जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा सुरू करण्यासाठीच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर केला आहे. मात्र विश्व पानसरे यांच्या बदलीला CAT ने स्थगिती दिल्यामुळे ही एक प्रकारे फडणवीसंना चपराकच बसल्याचं ही सपकाळ म्हणाले.

पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती

बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची नऊ महिन्याच्या कालावधीतच अमरावती येथे राज्य राखीव दलाच्या पथकात नुकतीच बदली झाली होती. मात्र या बदलीला आव्हान देत विश्व पानसरे यांनी CAT मध्ये याचिका केली होती. यावर तात्काळ सुनावणी घेत विश्व पानसरे यांच्या बुलढाणा येथून झालेल्या बदलीला कॅट ने स्थगिती दिली आहे. मात्र तत्पूर्वीच बुलढाणा येथे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे की निलेश तांबे? असा डेडलॉग सध्या तरी दिसत आहे. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा सूरू व्हावे म्हणून पानसरेंची बदली केली का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे. तर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती म्हणजे फडणवीसांना चपराक असल्याची बोचरी टीका ही त्यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.