गणित न आल्याने शिक्षकाची चौथीतील विध्यार्थ्याला अमानुष मारहाण; खामगावमधील संतापजनक प्रकार
बुलढाणा क्राईम न्यूज : अलीकडेच 13 डिसेंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र याचाही परिणाम शाळेतील शिक्षकांवर होताना दिसत नाहीया. नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गणित चुकलं म्हणून वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थ्यांवर सध्या खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अवघ्या साडेनऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण, अद्यापही कारवाई नाही
पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीत शिकणारा पवन इंगळे असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याचं वय अवघ साडेनऊ वर्षे आहे. तर मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव रवींद्र ची असं आहे. पिंपळगाव राजा पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पिंपळगाव राजा पोलिसांनी सदर विद्यार्थ्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं. त्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र अवघ्या साडेनऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकावर अद्यापही पोलीस अथवा शिक्षण विभागाने कारवाई केलेली नाही.
दरम्यानया प्रकारामुळे मात्र मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये संताप दिसत आहे. आता पोलिस आणि शिक्षण विभाग या शिक्षकांवर काय कारवाई करतो हे बघणं महत्त्वाचं असेल.
Jalgaon Crime : पाचोर्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; दोघे अटकेत, एक फरार
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार आहे. मे ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत तसेच संशयित आरोपींनी फोटो काढून ते व्हायरल करण्याच्या धमक्या देत पीडितेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेने पालकांकडे प्रकार सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. अटक आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.