मी गेलेल्या एका लग्नात तर नवरीच पळून गेली होती, सुजय विखेंकडून अजितदादांची पाठराखण
Sujay Vikhe Patil on Ajit Pawar, अहमदनगर : हुंड्याची मागणी आणि घरगुती हिंसाचारातून वैष्णवी हगवणे (vaishnavi hagawane) या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. कारण वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांच्याकडून तिचा छळ करण्यात आला होता. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते होते. या प्रकरणात हगवणे कुटुंबातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या (vaishnavi hagawane) लग्नात अजित पवारांनी (Ajit Pawar) उपस्थिती लावली होती. त्यावरुन अजित पवारांवर (Ajit Pawar) राज्यभरातून टीका होत आहे. अजित पवारांवर होत असलेल्या टीकेवर आता माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुजय विखे काय काय म्हणाले?
सुजय विखे म्हणाले, अजित पवार एक होतकरु नेतृत्व आहे. आम्ही देखील अनेक लग्नात जातो भेटी देतो..त्यातील अनेक संसारांबाबत वेगवेगळ्या गोष्टी घडतात..मी गेलेल्या एका लग्नात तर नवरीच पळून गेली होती मग काय करणार..त्यामुळे अशा प्रकरणात राजकीय व्यक्तींना आणलं गेलं नाही पाहिजे..हगवणेंना यापूर्वी कोणीही ओळखत नव्हतं. मात्र आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला. त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे..त्यामुळे राजकीय व्यक्तींना अशा प्रकरणात ओढू नये. आमच्याबरोबर देखील अनेक जण फोटो काढतात. त्यानंतर काहीजण म्हणतात वाळू तस्कर आहे.. हा आरोपी होता. हे टाळायचं असेल तर कायदाच करावा लागेल. प्रत्येक आरोपीच्या कपड्यांवर बिल्ला लावण्याची वेळ येईल. केवळ लग्नाला गेल्यामुळे अजित दादांना काही लोक टार्गेट करतात..जे सध्या बोलतायेत ते शिवसेना उबाठा गटाचे असतील तर त्यांना लग्नाच्या पत्रिकाच येत नाही..ज्या लोकांना पत्रिका येत नाही त्या लोकांना कोणी लग्नात गेला तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उबाठा आणि पवार गटाच्या प्रवक्त्यांना देखील लग्नाच्या पत्रिका द्यायला सुरुवात करा.
माझ्या वडिलांनी माझं लग्न सामुदायिक सोहळ्यात लावलं : सुजय विखे
पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले, विखे परिवारात मी एकुलता एक होतो. तरी माझ्या वडिलांनी माझं लग्न सामुदायिक सोहळ्यात लावलं. त्या मागची भावना कार्यकर्त्यांनी साध्या पद्धतीने लग्न करावे ही होती. मात्र आज कार्यकर्तेच जंगी लग्न लावतात. मोठ्या गाड्या देतात. त्यामुळे सगळ्या लोकप्रतिनिधींनी साध्या पद्धतीचे लग्न करून देण्याचा आदर्श घातला पाहिजे..
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.