जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात!

गुन्हेगारीची बातमी ठेवा: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्या काळ्या कारनाम्यांचे किस्से आता बाहेर येत आहेत. अशातच आता जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. सोबतच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आधी तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, वरिष्ठ लिपिक कार्यालयीन अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदांवरील बदल्यांचे अधिकार विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांना होते. मात्र सुपेकरांनी विभागीय उपमहानिरिक्षकांचे हे अधिकार काढत ते स्वतःकडे घेतले. त्यानंतर 2023 या एकाच वर्षात 14 वेळा विविध बदल्यांचे आदेश निघाले असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, सुपेकर यांच्या कार्यकाळात एकूण जवळपास 450 बदल्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या बदल्यांमध्ये तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, वरिष्ठ लिपिक कार्यालयीन अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील 205 बदल्यांमध्ये संशयास्पद आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी सुपेकर एकाच विभागात कार्यरत राहण्याची आधीची 10 वर्षाची मुदत घटवत ती  6 वर्षांवर आणली असल्याचे ही बोललं जात आहे. या कार्यरत काळाची मुदत घटवल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल्यांचे व्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनीही केले होते गंभीर आरोप

काही दिवसापूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी ही  जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  जालिंदर सुपेकर  यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) (Special IG Prisons) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती येथील कारागृहात असणाऱ्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केला आहे. यासंदर्भात आपण नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.

जालिंदर सुपेकरांची बदली, डिमोशनही झालं

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.