मनोज जरांगेंच्या आंदोलनात सक्रीय तडीपार वाळू माफिया पुन्हा ॲक्टिव, अंबडच्या गोदापात्रात एकास ला

जलना: मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय असलेला तडीपार वाळूमाफिया सुयोग साळुंके आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसतंय.  तडीपार वाळूमाफिया सुयोग साळुंखेची दादागिरी समोर आली आहे. तडीपार असतानाही जालना जिल्ह्यात येऊन एकास जबर मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय.  संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जालन्यात अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील एकूण 9 जणांना  हद्दपार करण्यात आलं होतं. हद्दपार केलेल्या वाळूमाफी यांच्या नावांमध्ये मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह वाळू माफिया सुयोग साळुंखेचही नाव होतं.

अवैध वाळू उत्खनन जाळपोळ धमकावणे मारहाण अशा अनेक गुन्ह्यांची वाळू माफिया सुयोग साळुंखेवर नोंद आहे.  हद्दपार केले असले तरी पुन्हा अंबडच्या आपेगाव स्थित गोदापात्रात एकास मारहाण केल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमकं झालं काय?

शासनाच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू टाकणाऱ्या इसमास लाठकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला असून त्याच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात मारहाण करणे तसेच धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तडीपार वाळू माफिया सुयोग साळुंखे यांनी तडीपार असताना जालना जिल्ह्यात येऊन अंबडच्या गोदापात्रातील एका इसमास बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. तडीपार असताना जिल्ह्यात प्रवेश करून मारहाण करणारा वाळू माफिया सुयोग साळुंखे अद्याप मोकाट असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी पिढीत तरुणांनी केली आहे.

बेकायदा वाळू उत्खनन, चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा यासह इतर गुन्ह्यांमध्ये असलेल्या गुन्हेगारांवर फेब्रुवारी महिन्यात तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या सख्ख्या मिळवण्यासह दहा वाळू माफियांवर ही कारवाई करण्यात आली होती. यातील आरोपी सुयोग साळुंखेला देखील एका वर्षासाठी जालना छत्रपती संभाजी नगर आणि बीड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल होत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू करण्यासाठी 29  ऑगस्ट रोजी मुंबईला मार्च करणार असल्याचे कार्यकर्ते मनोज जरंगे यांनी रविवारी सांगितले.सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात राजकीयदृष्ट्या वर्चस्व असलेल्या समुदायासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा उपोषण करणारे जरांगे जिल्ह्यातील अंबड तहसीलमधील महाकाला गावात बोलत होते.

https://www.youtube.com/watch?v=2SIF15JXVXQ

हेही वाचा

Ratnagiri Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग

आणखी वाचा

Comments are closed.