10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या

सांगली : राज्यात गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडाडीची मोहीम हाती घेतली असून लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना दणका दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यास 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. आता, लाच मागितल्या प्रकरणी सांगली (Sangli) महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 7 लाख रुपयांची लाच (bribe) मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 10 लाखांची मागणी करून 7 लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरुन सापळ रचला. त्यानुसार, तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्त महोदयांनी 7 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यावरुन, एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, एसीबी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यास झाली होती अटक

छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना गेल्याच महिन्यात लाच घेताना एसीबी पथकाने अटक केली होती. उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल 41 लाखांची मागणी केली होती. यापूर्वी या प्रकरणात 23 लाख रुपये त्यांची घरीही पोहोचले होते. मात्र, आणखी 18 लाख रुपयांची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली. अखेर पाण्यासारखं पैसे मागणाऱ्या या लाचखोर (Bribe) अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर, एसीबीच्या अधिकाऱ्यांना सापळा रचून लाचखोर विनोद खिरोळकरला अटक केली होती. त्यानंतर, त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता मोठं घबाड पोलिसांना सापडलं. त्यामध्ये, तब्बल 50 लाख रुपयांचे सोनं आहे. 589 ग्रॅम म्हणजेच 59 तोळे सोनं एसीबीने जप्त केलं होतं.

हेही वाचा

सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत पवार, शिंदे, फडणवीसांचं पुसलं जाणार नाही; सुनिल तटकरेंकडून फुल्ल कौतुक

आणखी वाचा

Comments are closed.