कोल्हापुरात हादरवणारं हत्याकांड, धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवलं
कोल्हापूर गुन्हेगारीच्या बातम्या: कोल्हापुरात हादरवणारी घटना घडली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील हादरवणारा प्रकार समोर आला आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेतच प्रकार घडल्यानं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन केली हत्या करण्यात आली आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. शिक्षण संस्था बंद पडून घरी जायला मिळावं म्हणून विद्यार्थ्यांनीच हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. फैजान नाजिमा असं हत्या केलेल्या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. फैजान हा मूळचा बिहार राज्यातील रहिवासी असून त्याचा झोपेत असतानाच संशयास्पद मृत्यू झाल्यानं या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर फैजानच्या हत्येमागील धक्कादायक वास्तव समोर आलं. संस्थेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन फैजानची हत्या केल्याची कबुली चौकशीदरम्यान दिल्याची माहिती मिळत आहे.
शॉक देऊन का मारलं?
हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील धार्मिक शिक्षण देणारी संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी, यासाठी फैजान नजिम या अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं रविवारी रात्री फैजानच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि त्याला इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला. यामध्ये फैजान नजिमचा मृत्यू झाला. अल्पवयीनं विद्यार्थ्यानं चौकशीअंती फैजान नजिमची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या या कृत्यामुळे अख्खा जिल्हा हादरून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी वाल निरीक्षणगृहात केली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, अधिक तपास सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा सहभाग असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार आणखी दोन मुलांची चौकशी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कट करून हा गुन्हा केला असावा, यासाठी त्यानं वायर कुठून आणली? गुन्हा केल्यानंतर यायर कुठे लपवली? याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.